Breaking News LIVE : मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज यांचे कोरोनामुळे निधन

Breaking News LIVE Updates, 15 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Apr 2021 06:47 AM
मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज (वय 47) यांचे कोरोनामुळे गुरुवारी संध्याकाळी कांदिवली येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारा आघाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. 

मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रशांत रेडीज (वय 47) यांचे कोरोनामुळे गुरुवारी संध्याकाळी कांदिवली येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. शिक्षकांच्या प्रश्नासाठी झटणारा आघाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. 

हाफकिन संस्थेस कोवॅक्सीन लस उत्पादित करण्यास मान्यता, मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार 

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.


विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे. सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या  अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी.


यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.

केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद

केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद. ताजमहाल, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार.

आज राज्यात 61,695 नवीन रुग्णांचे निदान

Breaking News LIVE : आज राज्यात 61,695 नवीन रुग्णांचे निदान, आज 53,335 रुग्ण बरे होऊन घरी, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 टक्के एवढे #Maharashtra #corona

केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद

केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अंतर्गत येणारी स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद


ताजमहाल लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार..

कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांना विशेष पॅकेज जाहीर करा


कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगारांना विशेष पॅकेज जाहीर करा,


अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ,


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांना पत्र,


अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली मागणी

बंदी असणाऱ्या निर्यातदारांकडून कायदेशीररित्या रेमडेसिवीर खरेदी घेण्याबाबत चर्चा सुरु : राजेश टोपे

बंदी असणाऱ्या निर्यातदारांकडून कायदेशीररित्या रेमडेसिवीर खरेदी घेण्याबाबत चर्चा सुरु असून राज्यात असलेला रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आठवड्याभरात कमी करण्याचा प्रयत्न करुन असं आश्वासन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं. तसंच केंद्राकडून 4 ते 5 राज्यांकडून ऑक्सिजन घेण्याची परवानगी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

येत्या 19 एप्रिल पासून होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत  येत्या 19 एप्रिल पासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जून मध्ये घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल.

19 एप्रिलपासून होणारी वैद्यकीय परीक्षा आता जूनमध्ये होणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत येत्या 19 एप्रिलपासून घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्या माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे. या परीक्षा आता येत्या जून महिन्यात घेण्यात येणार असून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत जाहीर करण्यात येईल. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही चर्चा झाली आहे, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

सोलापुरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 30 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

शासनाने संचारबंदी जाहीर केल्यानंतरही सोलापुरात अनेक नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केल्याचं दिसून येतंय. त्यावर आता पोलिसांनी कारवाई करत 30 हून अधिक लोकांना ताब्यात घेतलंय. शहरात अनेक चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली असून अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा कोविड भ्रष्टाचार, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप

ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बीएमसी रेमडेसिवीर 1568 रुपयांना खरेदी करते, तर सरकारची हाफकीन इन्स्टिट्यूट 565 रुपयांना खरेदी करते. घाऊक बाजारात त्याची किंमत 1200 रुपये इतकी आहे असं सांगत रेमडेसिवीर घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. 

राजेश टोपेंची ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरबाबत FDA च्या अधिकाऱ्यांसोबत आज बैठक

आरोग्यमंत्री राजेश टोपे आज राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत FDA च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. या बैठकीत सध्या राज्यातील परिस्थिती आणि करायच्या उपाययोजना याबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यात रुग्णालयातील उपलब्ध बेडस, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवा याबाबत देखील सर्व अधिकारी आणि शासकीय रुग्णालयात अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे.


 

कल्याण रेल्वे स्थानकावर वर्दळ कायम, निर्बध पायदळी, पोलीस फिरकलेच नाही

कल्याण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल रात्री पासून राज्यभरात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केलेत. रेल्वेसह सार्वजिंक वाहतूकीसाठी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे स्थानकावर काल दुपारपासूनच बॅरिगेटिंग लावण्यात आले आहेत. फक्त दोन गेट खुले ठेवण्यात आले होते. मात्र आज सकाळच्या सुमारास स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांची कोणत्याही प्रकारची विचारपुस करण्यात येत नव्हती. निर्बंधांची अंमलबाजावणी करण्यासाठी रेल्वेचे पोलीस दल या ठिकाणी फिरकलेही नाही. त्यामुळे प्रवाशी थेट प्रवास करताना दिसत होते. तर स्थानकाबाहेर रिक्षांची गर्दी दिसून आली. एकूणच दरदिवशीप्रमाणेच गर्दी नसली तरी गर्दी मात्र दिसून आली.   

कोरोनाच्या संकटात वेगवेगळ्या मागण्यांसाठी शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचं कामबंद आंदोलन

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशासह राज्यातही हाहाकार माजवला आहे. अशातच कोरोना संकटात कोरोना बाधितांना बंर करणाऱ्या डॉक्टरांवरच आंदोलन करण्याची वेळ आली आहे. कोरोना संकटात वेगवेगळ्या मागण्यांसाठी शासकीय, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास 22 एप्रिलपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे. 

मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स चालवून केलं लोकार्पण

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या स्थानिक विकास निधीमधून काल (14 एप्रिल) सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाला अत्यंत आधुनिक अशा दोन कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स देण्यात आली. या रुग्णवाहिकांचं लोकार्पण देऊळगाव राजा इथे संपन्न झालं. यावेळी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत लोकार्पण केलं.

धुळ्यात आंबेडकर जयंती दिनी नियमांचे सर्रास उल्लंघन, परवानगी नसूनही डीजेचा वापर, सोशल डिस्टन्सचा बोजवारा

एकीकडे संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असताना मुख्यमंत्र्यांनी पुढील 15 दिवस संचारबंदी लागू केली आहे, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र दुसरीकडे धुळे शहरातील साक्री रोड भागात असलेल्या भीमनगर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी प्रशासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी डीजेला परवानगी नसतानाही सर्रासपणे डीजेचा वापर करण्यात आला तर यावेळी डीजेच्या तालावर ठेका धरत येथील रहिवाशांनी सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडवला. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलीस प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आम्ही पाकिस्तानात राहत नाही,आम्ही लष्कर-ए-तोयबाचे लोक नव्हे : संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी दाखल झाले असून विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी समिती आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विमानतळावर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. "आम्हाला कोणी रोखत असेल तर आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही पाकिस्तानमध्ये राहत नाही. आम्ही लष्कर-ए-तोयबाचे लोक नाही. आम्ही देखील तुमच्या इतके प्रखर राष्ट्रवादी, प्रखर हिंदुत्ववादी आहोत. सीमाप्रश्नाचा लढा हा मराठीचा, हिंदुत्वाचा लढा आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्यायाविरुद्धचा लढा आहे. आम्ही न्यायासाठी लढत आहोत. या लढ्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत. शिवसेनेने हुतात्मे दिलेत," असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पार्श्वभूमी

राज्यातील निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा : मुख्यमंत्री
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता 'ब्रेक दि चेन'मधील निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी तसेच पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला गाफील राहून चालणार नाही आणि संसर्ग आणखी फैलावलेला परवडणार नाही. निर्बधांची अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.


Maharashtra Lockdown:एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही, मात्र... 
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतानाच दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यांत 15 दिवसांसाठी संचार बंदीची घोषणा केली. बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात 144 कलम लागू करण्यात आलं असून पुढील 15 दिवसांसाठी संचारबंदी असेल. या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांना अनेक महत्वाचे प्रश्न पडले आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज आहे की नाही? तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं आहे. राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी पासची गरज नाही. मात्र जर पोलिसांनी याबाबत विचारणा केली तर कारण मात्र सांगावं लागणार आहे.  


उस्मानाबादेत एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार, जागा अपुरी पडल्याने 8 मृतदेहांचा आज अंत्यविधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती अतीगंभीर होताना दिसत आहे. उस्मानाबादच्या स्मशानभूमीत याची प्रचिती आली. उस्मानाबाद स्मशानभूमीत आज कधी न पाहिलेले चित्र पाहायला मिळालं. बुधवारी एकाचवेळी 19 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आले. तर 8 मृतदेहांवर आज अंत्यविधी करण्यात येणार आहेत. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून आल्या. उस्मानाबाद शहरानजिक असलेल्या असलेल्या स्मशानभूमीत बुधवारी 19 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे अवघ्या एक-एक फुटावर सरण रचण्यात आली होती. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अंत्यसंस्कारासाठी जागा पुरत नसल्यामुळे 8 मृतदेहांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. 


सरकार बदलणारा अजून जन्माला यायचाय, हे कुणा येरा गबाळ्याचं काम नाही; अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे  कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दात आज अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला. बुधवारी संध्याकाळी पंढरपूर येथील शिवाजी चौकात राष्ट्रवादी उमेदवार भागीरथ भालके यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. आजवर अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतक्या थेट शब्दात कधी बोलले नव्हते. मात्र आजची राष्ट्रवादीची सभा ही फडणवीसांच्या सभेला उत्तर देणारी सभा ठरली. या सभेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांच्या भाषणाचा रोख हा फडणवीस यांच्या वक्तव्यावर होता. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.