Breaking News LIVE : मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक
Breaking News LIVE Updates, 30 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलं होतं. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती. राजेश पांडेला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉज वरून अटक केली आहे. कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीला रवाना झाली आहे.
कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवार1 जुलै रोजी लसीकरण बंद राहणार आहे.
राज्यात आज 9771 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 353 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 141 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.
पुणे महापालिकेत 23 गावांचा अखेर समावेश, राज्य शासनाकडून अद्यादेश जारी, यामुळे आता पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका झालीय.
मु़ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षा निवास्थानी महाविकास आघाडीच्या समन्वय समिती नेत्यांसोबत महत्वाची बैठक सुरू. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित, बैठकीत पावसाळी अधिवेशन संदर्भातील रणनिती तसेच विधान सभा अध्यक्ष पद निवडणुकी संदर्भात महत्वाची चर्चा होतेय.'
मु़ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षा निवास्थानी महाविकास आघाडीच्या समन्वय समिती नेत्यांसोबत महत्वाची बैठक सुरू. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित, बैठकीत पावसाळी अधिवेशन संदर्भातील रणनिती तसेच विधान सभा अध्यक्ष पद निवडणुकी संदर्भात महत्वाची चर्चा होतेय.'
काँग्रेसने आपल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे, 5 आणि 6 तारखेला सभागृहात उपस्थित राहण्याबाबत व्हीप जारी केला.
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीत होणार चर्चा, तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेत्यांची होणार लवकरच बैठक, अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी होणार बैठक, अध्यक्षपदाच्या नावावर एकमत होणं गरजेचं असल्यानं बैठक महत्वाची
आषाढी एकादशीला 10 पालखी सोहळ्यात येणाऱ्या 400 भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन; आषाढी यात्रा बैठकीत झाला निर्णय.
Monsoon update : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात पाऊस अपेक्षित नाही. मात्र, काही ठिकाणी हलक्या सरींची अपेक्षा, अपेक्षित पाऊस नसल्याने पेरण्या रखडणार. 29 जूननंतर पाऊस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याचा अंदाज. कोकणासह, विदर्भ आणि मराठवाड्याला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात दिलासा मिळणार
गेल्या वर्षी एफआरपी अदा केली ती तुकड्या तुकड्याने कारखांदारांनी दिली आहे. या वर्षी एकरक्कमी एफआरपी द्यावी. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, शेतकऱ्यांना व्याज दिले पाहिजे अन्यथा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. तातडीने व्याज मिळावे अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. इथेनॉल मधला हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि ऊस दर नियंत्रण समिती आहे, त्यामध्ये विचारविनिमय केला पाहिजे असंही ते म्हणाले.
औरंगाबाद : औरंगाबादेत तिसऱ्या दिवशी सुद्धा लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. प्रोझोन मॉल लसीकरण केंद्र सकाळपासूनच लोक रांगेमध्ये उभा होते. ऊन वाढत चालल्याने लोकांनी चक्क चपलाची रांग लावली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात आज 12 केंद्रांवर लसीकरण सुरु आहे. या केंद्रांवर कोविशिल्डचा साठा उपलब्ध नाही तर कोवॅक्सिन उपलब्ध असून हा साठा दोन दिवस पुरेल इतका आहे. जिल्ह्यात 16 लाख 41 हजार 193 लोकांना लस द्यायची आहे. आतापर्यंत 3 लाख 97 हजार 174 लोकांनी पहिला डोज तर 87 हजार 612 लोकांनी दोन्ही डोज घेतले आहे.
मीरा-भाईंदर मनपा अधिकाऱ्यांची अजब दादागिरी ; वाद घालणाऱ्या फेरीवाल्याचं सामान रस्त्यावर फेकलं, अधिकाऱ्यांकडून गाडीची नासधूस, व्हिडीओ व्हायरल; भाजप, मनसेकडून हल्लाबोल
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे पालिकेचा हद्दवाढीचा निर्णय, पुण्याच्या भोवतालची 23 गावं महापालिका हद्दीत घेण्याचा निर्णय
एसबीआयचे बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट खातं असलेल्या ग्राहकांसाठी नवे नियम, प्रतिमहिना 4 एटीएम व्यवहार नि:शुल्क, मात्र त्यापुढील व्यवहारांवर शुल्क आकारणार, 1 जुलैपासून एसबीआयचे नवे नियम लागू होणार, 12 कोटी ग्राहकांना नव्या नियमांचा फटका
पालघर जिल्ह्यात 54 लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु असून जिल्ह्यात दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. आत्तापर्यंत 4,47,871 जणांना पहिला डोस देण्यात आला असून 94,942 जनांना दुसरा डोस देण्यात आलाय. तर एकूण 5,42,813 डोस देण्यात आले आहेत.
कोल्हापुरातील सर्व दुकाने उघडण्याच्या प्रस्तावावर आज मुंबईत बैठक होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज चर्चा होणार आहे. व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेली दोन दिवसांची मुदत उद्या संपत आहे. या बैठकीत शहराचे आमदार चंद्रकांत जाधव आणि व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी संजय शेटे उपस्थित राहणार आहेत.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर दोघांचीही बिनविरोध निवड बिनविरोध झाली आहे. महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौर पदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची वर्णी लागली आहे. महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने भाजपकडे उमेदवार नव्हता. त्यामुळे भाजपने या निवडणुकीत अर्ज दाखल केला नाही.
औरंगाबाद : शहरातील सेव्हनहिल पुलावर भरधाव कार तब्बल 50 फुटांपर्यंत चक्क दुभाजकावर चालली. ट्रकने हुलकावणी दिल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून 50 फूट लोखंडी ग्रीलही तुटले. कारचेही बरेच नुकसान झाले. त्यात एअरबॅग उघडून फुटल्या. त्यामुळे कारमधील काका-पुतणे हे बालंबाल बचावले. रात्री उशिरा हा अपघात झाला. अथर्व अरुण टेकाळे आणि त्यांचा काका सुनील टेकाळे हे दोघे कारमध्ये होते. सुनील हे कार चालवित होते. कारमालक अरुण टेकाळे हे फुलंब्री तालुक्यातील एका कॉलेजवर प्राचार्य आहेत.
अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड आज करण्यात येणार आहे. महापौर आणि उपमहापौर दोघांची बिनविरोध निवड होणार आहे. महापौर पदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे तर उपमहापौर पदी राष्ट्रवादीचे गणेश भोसले यांची बिनविरोध निवड केली जाणार आहे. महापौरपद अनुसूचित जाती साठी रखीव असल्याने भाजपकडे उमेदवार नसल्याने भाजपने निवडणुकीत अर्ज दाखल केला नाही त्यामुळे निवड बिनविरोध होणार आहे.
आज स्वीकारणार पदभार...
- महानगरपालिका पक्षीय बलाबल :
शिवसेना - 23
राष्ट्रवादी - 19
भाजप - 15
काँग्रेस - 5
बसपा - 4
सपा - 1
रत्नागिरी जिल्ह्यात आज (30 जून) कुठेच कोरोना लसीकरण होणार नाही. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून एकही डोस उपलब्ध नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.
अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या 'एकला चलो रे'च्या भूमिकेवर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आघाडी करुन लढणार आहे. आज या तिन्ही पक्षाची जागावाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अकोला संपर्कमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, अकोल्याचे पालकमंत्री आणि 'प्रहार'चे अध्यक्ष बच्चू कडू, शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख उपस्थित राहणार आहेत. आज अकोल्यासाठी काँग्रेस वगळता इतर तिने पक्षांच्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीपूर्वी अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा झाला आहे. शिवसेनेचे नगरसेवक अनिल शिंदे आणि नगरसेविकेचे पती निलेश भाकरे यांच्यात वाद झाला आणि या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. विशेष म्हणजे शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर हे अहमदनगरमध्ये असताना शिवसेनेत हा राडा झाला आहे. या घटनेत भाऊ कोरेगावकर यांना देखील धक्काबुक्की झाल्याची चर्चा होत आहे. पण मला कोणतीही धक्काबुक्की झाला नसल्याचा खुलासा भाऊ कोरेगावकर यांनी केला. दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
राज्यात मंगळवारी 8,085 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 231 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात काल (29 जून) 8,085 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 8 हजार 623 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 अॅक्टिव रुग्ण आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 13 लाख 98 हजार 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 (14.62 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
Whip: 'अधिवेशन संपेपर्यत आमदारांनी सभागृहात उपस्थित राहा', शिवसेनेकडून व्हिप जारी
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै 2021 असे दोनच दिवस घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आमदारांना अधिवेशन संपेपर्यत आमादारांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा व्हिप आपल्या आमदारांना बजावला आहे. शिवसेनेकडून मंगळवारी (29 जून) आपल्या आमदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, "राज्याचे पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलैला होत आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करुन मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांनी संपूर्ण दिवस उपस्थित राहावं असा पक्षादेश आहे". हा व्हिप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी यांनी शिवसेना विधीमंडळ पक्षनेते कार्यालय या पत्राद्वारे जारी करण्यात आला आहे.
'निकोटीन' कोरोनापासून बचावासाठी परिणामकारक; जाणकारांच्या समितीचा अहवाल हायकोर्टापुढे सादर
धुम्रपानामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. उलट त्यातील `निकोटीन’ हा कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा घटक असल्याचा दावा करणारा हस्तक्षेप अर्ज मंगळवारी फेडरल रिटेलर असोसिएशन आणि पान-बिडी-तंबाखू विक्रेता संघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. त्याची दखल घेत या दाव्यात तथ्य आढळल्यास केंद्र सरकारला आता सिगरेटसह अन्य तंबाखूच्या पाकिटांवरुन वैधानिक इशारा काढायला हरकत नाही, असा खोचक टोला हायकोर्टानं लगावला. मात्र हा हस्तक्षेप अर्ज दाखल करुन घेत त्यांना सविस्तर युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ
इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनवल्यानंतर काल (29 जून) कोर्टात हजर केलं होतं. यात 1 इराणी कोरिओग्राफर महिला आणि 4 साऊथ सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रींची समावेश आहे. कोरोना नियम उल्लंघन, मद्य सेवन, तंबाखूजन्य पदार्थ यांचं सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. रेव्ह पार्टीत ड्रग्स वापर करणाऱ्यांसोबत यांच्या कनेक्शनचा तपास करण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टानं केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -