Coronavirus Update News, Breaking News LIVE : सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पुढे ढकलल्या
Coronavirus Update News, Maharashtra Lockdown, Breaking News LIVE Updates, 27 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये

Background
Maharashtra Vaccination : महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी, एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण
मुंबई : कोरोना लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लसे देण्यात आली आहे. कालच्या लसीकरणाच्या अंतीम आकडेवारीत वाढ होऊ शकते. 3 एप्रिलला 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेनेचे अभिनंदन केले आहे.
लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत आहे. उद्याच्या लसीकरणांनंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांपेक्षा महाराष्ट्र पुढे असून आज (26 एप्रिल) राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 6155 लसीकरण केंद्र होते. त्यामध्ये 5347 शासकीय आणि 808 खासगी केंद्रांचा समावेश आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला आठ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या पहिल्याच दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.
एमबीबीएसच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्गाच्या परीक्षा जूनमध्ये होणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
नागपूर : एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या ज्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या होत्या त्या जूनच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.एमडीची परीक्षा आम्ही घेतली आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे एमबीबीएसच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी त्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या होत्या असेही देशमुख म्हणाले.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व आहे. त्याचे व्याप चार पटीने जास्त आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण येणं स्वाभाविक आहे. मात्र आता 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत आहे आणि स्थिती सुधारत आहे हे संकेत दिलासादायक असून लॉकडाऊनचे सकारात्मक संकेत असल्याचे देशमुख म्हणाले.
यवतमाळ शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड
यवतमाळ शहरातील कोविड डेडीकेटेट शाह हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड, घाटंजी तालुक्यातील शिवणी येथील कविता धनराज चव्हाण ह्या कोरोना बाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिची प्रकृती चिंताजनक होती, यात रुग्णालयातील नर्स स्टाफने रुग्णाचे ऑक्सिजन मास्क काढल्याने रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली, पोलीस घटनास्थळी दाखल ..
त्या लोको पायलटच्या कार्याची नोंद अखेर मध्य रेल्वेने घेतली
त्या लोको पायलटच्या कार्याची नोंद अखेर मध्य रेल्वेने घेतली, विनोद जांगीड यांचा आज मध्य रेल्वेच्या डीआरएम यांच्याकडून सत्कार करण्यात आला, एबीपी माझाने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर मध्य रेल्वेने केला सन्मान, विनोद हे वांगणी इथे झालेल्या घटनेतील एक्सप्रेसचे लोको पायलट होते, त्यांनी प्रसंगावधान आणि समयसूचकता दाखवून इमर्जन्सी ब्रेक्स लावल्याले, त्या लहान मुलासोबत, मयूर शेळके आणि त्या एक्सप्रेस मधील प्रवासी देखील सुरक्षित राहिले.























