Breaking News LIVE : मराठा समाजाचं आंदोलन स्थगित नाही, खासदार संभाजीराजेंची माहिती

Breaking News LIVE Updates, 17 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2021 10:49 PM
खासदार संभाजीराजे छत्रपती दोन आठवडे आंदोलन स्थगित करणार

खासदार संभाजीराजे छत्रपती दोन आठवडे आंदोलन स्थगित करणार, सरकारने दिलेल्या आश्वासनांनातर आंदोलन स्थगित करणार

मराठा आरक्षण प्रश्नावरील बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

मराठा आरक्षण प्रश्नावरील बैठकीसाठी छत्रपती संभाजी राजे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बैठकीला पोहोचतील. काल कोल्हापुरात मराठा समाजाचा मोर्चा निघाल्यानंतर हा प्रश्न समजून घेण्यासाठी साडेपाच वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होईल

पुणे, सातारा आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट

पुणे, सातारा आणि रत्नागिरीसाठी आज रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  मात्र पुणे साताऱ्यातील घाट माथ्यांवर अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. 

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.  मुसळधार पावसाने पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले असून राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी  ३० फुटांवर पोहचली आहेय जिल्ह्यातील 48 बंधारे पाण्याखाली गेले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

LIVE : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक, मनसुख हिरण हत्या प्रकरणात एनआयएची कारवाई

यवतमाळमध्ये कपाशीचे 30 क्विंटल बोगस बियाणे जप्त, एका आरोपीला अटक

यवतमाळ जिल्ह्यात 48 लाख रुपये किमतीचे कपाशीचे 30 क्विंटल बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहेत. यवतमाळच्या वटबोरी येथे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस गस्तीवर असतांना संशयास्पद असलेल्या एका जीपमध्ये हे बोगस बियाणे आढळून आले. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


 

शाई फेक प्रकरणी म्हाडाच्या कर्मचारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन

वरळी मतदारसंघातील मराठी कंत्राटदाराला शिवसेनेकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला होता. वर्क ऑर्डर मिळूनही म्हाडाकडून काम देण्यासाठी दिरंगाई करण्यात येत होती. यावरुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकाऱ्याला काळं फासण्याचं आंदोलन केले होते. मनसेच्या या आंदोलनाच्या निषेधार्थ आज म्हाडा अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या गेटबाहेर आंदोलन केले.

यवतमाळमध्ये कपाशीचे 30 क्विंटल बोगस बियाणे जप्त, एका आरोपीला अटक

यवतमाळ जिल्ह्यात 48 लाख रुपये किमतीचे कपाशीचे 30 क्विंटल बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहेत. यवतमाळच्या वटबोरी येथे पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस गस्तीवर असतांना संशयास्पद असलेल्या एका जीपमध्ये हे बोगस बियाणे आढळून आले. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 


 

आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी संघटना आक्रमक, नाशिकच्या द्वारका चौकात रास्तारोको

आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसी संघटना आक्रमक, नाशिकच्या द्वारका चौकात रास्तारोको, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेसह इतर ओबीसी संघटनाचा आंदोलनाला पाठिंबा, पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेत

बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर

बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सीबीएसईकडून सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्ड मूल्यमापनासाठी दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण ग्राह्य धरणार आहे. या गुणांना अनुक्रमे 30:30:40 टक्के महत्त्व असेल.

मनसुख हिरण मृत्यू प्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक होण्याची शक्यता

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

रत्नागिरीतील तीन नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ

रत्नागिरीत गेली चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तीन नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीची पाणी पातळी 6.75 मीटर तर राजापूरमधील कोदवली नदीची पातळी 6.30 मीटरने वाढली आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीची 5.10 मीटरने वाढली आहे. 

सांगलीत मुसळधार पाऊस

सांगलीत रात्रभर झालेल्या दमदार  पावसाने  सांगलीतला प्रसिद्ध शेरीनाल्याचे प्रचंड दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळले जात आहे. रात्रभराच्या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढच्या काही तासात मुसळधार पाऊस

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढच्या काही तासात मुसळधार पाऊस, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मुसळधारेचा अंदाज, ठाणे, पालघरमध्ये हलक्या सरींची शक्यता

अहमदनगरमध्ये किसान सभेच्या नेतृत्वात दूध आंदोलनाला सुरुवात

अहमदनगरमध्ये किसान सभेच्या नेतृत्वात दूध आंदोलनाला सुरुवात, अकोले तालुक्यातील अंबड येथे शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांचा संताप, 11 वाजता अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले तहसील कार्यालयावर निदर्शन

पुणे-बंगळुरु महामार्ग पावसामुळे बंद होण्याची शक्यता

दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कराड जवळील गोटे गावाजवळ पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर पाणी आलं आहे. सध्या या ठिकाणी धिम्या गतीने वाहतूक सुरु आहे. आणखी प्रवाह वाढल्यास येथील वाहतूक बंद करण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्याची शक्यता आहे.

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर एनआयएचे छापे

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या मुंबईतील अंधेरी परिसरातील घरावर एनआयएने छापे टाकले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहेत. सीआरपीएफच्या आठ ते दहा कंपन्या इथे तैनात आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत.

मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी 10 फुटांनी वाढली, अनेक बंधारे पाण्याखाली

सलग कोसळणार्‍या पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 12 तासात पंचगंगा नदीची पाणीपातळी 10 फुटांनी वाढली. सध्या पंचगंगा नदी 24 फुटांवरुन वाहत आहे. ग्रामीण भागातील अनेक छोटे छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर-गारगोटी मार्गावरील माजगावच्या छोट्या पुलाचा रस्ता वाहून गेला. शाहूवाडी तालुक्यातील गोगवेनजीक रस्त्यावर झाड आडवे पडून रस्ता ब्लॉक झाला आहे. भडगाव पूल पाण्याखाली गेला आहे तर गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

रत्नागिरीत पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठ, समुद्रकिनारच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

रत्नागिरी जिल्ह्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या काही काळ विश्रांती घेतलेला वरुणराजा जोराने बरसत आहे असं चित्र आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून काही नद्या या धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, समुद्रालाही उधाण येत असून खाडी आणि समुद्रकिनारच्या नागरिकांना देखील याबाबतच्या सूचना केल्या आहेत. 

निवळी घाटातील दरड हटवली, मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक चार तासांनी सुरु

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक चार तासांनी सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी घाटात दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला होता. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परंतु दरड हटवल्यानंतर आता वाहतूक पूर्ववत झाली आहे. 

पार्श्वभूमी

मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात आज बैठक
मराठा आरक्षणप्रश्नी काल (16 जून) कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आयोजित मूक आंदोलन पार पडलं. त्यानंतर आज, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चाचे विविध समन्वयक यांची एक महत्वपूर्ण बैठक वर्षा बंगल्यावर होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असतील. मूक आंदोलन संपल्यानंतर त्या ठिकाणीच एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते सरकारच्या प्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनाला प्रतिसाद देत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निश्चित करण्यात आलं. त्यानुसार आज, गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत वर्षा बंगल्यावर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.


'मागण्या पूर्ण करा अन्यथा परिणाम गंभीर', खासदार उदयनराजेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक होत असतानाच, दुसरीकडे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी सहा मागण्या केल्या आहेत. या मागण्या पूर्ण करा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं पत्रात म्हटलं आहे. "मराठा आरक्षण विषय दिवसेंदिवस फारच गंभीर होत चालला आहे. सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी 'मराठा' असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र 'खराटा'च येत आहे हे वेळेवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारने वेळीच ठोस पावले उचलली नाहीत, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे, असं खासदार उदयनराजेंनी पत्रात लिहिलं आहे.


राज्यात बुधवारी 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात बुधवारी (16 जून) 10 हजार 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 567 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या एकूण 1,36,661 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 21 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 12 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 56,79,746 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.7 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 237 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,86,41,639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,34,880 (15.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,78,781 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यंत्रणांना सूचना
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ अशी अशी भीती व्यक्त केली.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.