Breaking News LIVE : एनआयएची टीम मुकेश अंबानींच्या घराबाहेर दाखल, सचिन वाझेंसोबत घटनेचं नाट्यरुपांतर

Breaking News LIVE Updates, 19 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Mar 2021 07:15 AM
एनआयएची टीम मुकेश अंबानींच्या घराबाहेर दाखल, सचिन वाझेंसोबत घटनेचं नाट्यरुपांतर

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ज्या ठिकाणी स्कॉर्पिओ उभी होती, तिथे एनआयएची टीम दाखल, एनआयएकडून संपूर्ण घटनेचं नाट्यरुपांतर केलं जाणार, सचिन वाझेही उपस्थित

वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अनिस शेख यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सेवानिवृत्त उपसचिव अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. या पदासाठी उपसचिव दर्जाचा मुस्लीम अधिकारी पात्र ठरतो. यासाठी वक्फ बोर्डासमोर संदेश तडवी आणि अनिस शेख यांची नावे आली होती. यापैकी संदेश तडवी यांनी या नियुक्तीस नकार दिला. त्यामुळे उर्वरित उमेदवार अनिस शेख यांची नियुक्ती करण्यात आली. शासनाच्या मान्यतेनंतर या नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना आज जारी करण्यात आली आहे. 

कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्ग वाढतोय

कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यातच आता शाळांमध्ये सुध्दा कोरोनाची एन्ट्री झाली. असून 18 शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 7 शिक्षकही कोरोना बाधित झाले आहेत. पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासनाने 31 मार्चपर्यंत 5 ते 9 वी आणि 11 वीचे वर्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 336 कोरोना रुग्ण

अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 336 कोरोना रुग्ण आढळले. आज 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 44 हजार 558 वर.

सांगलीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, आज दिवसभरात 186 नवीन कोरोना बाधितांची नोंद

सांगली : जिल्ह्यात झपाट्याने कोरोना रुग्ण संख्या लागली वाढू लागल्याचं पाहायला मिळत आहे. आज 186 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे सांगली महापालिका क्षेत्रात एकूण 59 रुग्ण आढळून आले आहेत.  

परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने गाठला 10 हजारांचा टप्पा

परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने 10 हजारांचा टप्पा गाठला आहे. आज दिवसभरातही मोठ्या प्रमाणावर रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात 215 नवीन रुग्णांची भर पडली असून दिवसभरात 65 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंतची कोरोना बधितांची आकडेवारी 10152 वर पोहोचली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.  


 


 

तळकोकणातील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक यांच्यात वाद; मच्छीमारांचं मासेमारी बंद ठेवत आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्लेमधील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर मच्छीमार आणि पर्यटन व्यावसायिक यांच्यात वाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर शिरोडा वेळागर मधील 500 मच्छीमारांनी आज मासेमारी व्यावसायिक बंद ठेवत पर्यटक व्यावसायिकांच्या विरोधात आंदोलन केले. पर्यटन व्यावसायिक पॅरासिलिंग करताना त्याठिकाणचा समुद्र मोठ्या पॉवरच्या मशीन असल्याने ढवळून निघतो. त्यामुळे मच्छीमारांना मासे मिळत नसल्याची मच्छीमाराची तक्रार असल्याने मच्छीमार एकत्र येत आंदोलन केले. यावेळी त्यांनी समुद्र पर्यटनातील पॅरासिलिंग या किडा प्रकाराला विरोध असून तो बंद करा आणि इतर पर्यटन सुरू ठेवा अशी मागणी आंदोलन करणाऱ्या मच्छिमारानी बंदर विभागाकडे केली. शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावरील 3 ते 4 हजार मच्छिमाराना पॅरासिलिंग का जलक्रीडा प्रकाराने फटका बसणार असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली. तर दुसरीकडे गेल्या आठ दिवसांपासून मालवण मध्ये पारंपरिक मच्छीमार एलएडी मच्छिमारीच्या विरोधात मच्छ सहाय्यक कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत.

तलावातील विषारी पाणी पिऊन 1 निलगाय आणि 16 बकऱ्यांचा मृत्यू

तलावातील विषारी पाणी पिऊन 1 निलगाय आणि 16 बकऱ्यांचा मृत्यू. वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी तलावात टाकण्यात आले होते विष, सिंदेवाही तालुक्यातील आलेवाही गावाजवळ असलेल्या जंगलातील घटना, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून शिकारीच्या या प्रकरणात पळसगाव-जाट या गावातून 3 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

अमरावतीत काल रात्री 25 किलो जिलेटिनसह स्फोटकं जप्त

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील पंचवटी चौकामध्ये तब्बल 25 किलो जिलेटिन कांड्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. त्याचबरोबर जवळपास दोनशे नग डिटोनेटर सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलेली आहेत. या जिलेटिन आणि डिटोनेटरचा वापर कशासाठी आणि कोणाच्या सांगण्यामुळे करण्यात येत होता याचे कोडे मात्र अजून उलगडलेले नाही. तिवसा पोलिसांनी मोठ्या शिताफीने एका आरोपीला अटक केली असून एक आरोपी फरार झाला आहे.

बुलढाणा कोरोना अपडेट्स 

बुलढाणा जिल्ह्यात आज नवीन 732 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तसेच जिल्ह्यात गेल्या 24 तासात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 28,537 झाला असून 4802 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

गृहमंत्री अनिल देशमुख शरद पवर यांच्या निवासस्थानी

नुकतंच पोलीस दलातील झालेल्या बदल्या यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतयं. त्यासाठी गृहमंत्री शरद पवारांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत.

वीज बिल वसूली विरोधात स्वाभिमानीचा रास्ता रोको

थकीत वीज बील वसूलीसाठी  शेतकर्यांच्या शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे काम सुरू आहे. वीज वितरण कंपनीच्या या कारवाई विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे पंढरपूर ते सातारा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.

मलकापूर, नांदुरा परिसरात विजाच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

बुलडाणा | मलकापूर, नांदुरा परिसरात विजाच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस,
सकाळीच जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात.,
जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण, पावसामुळे आंब्यासह अन्य पिकांचं नुकसान

नंदुरबार दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून रवाना

नंदुरबार दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईहून रवाना


कार्यक्रम


सकाळी 9.35 वाजता: मुंबईहून ओझर विमानतळ येथे आगमन


सकाळी 10.35 वाजता- कोविड-19 लसीकरण व पोषण पुनर्वसन केंद्राची पाहणी
स्थळ: ग्रामीण रुग्णालय मोलगी, जि.नंदुरबार  


सकाळी 11.20 वाजता : महापारेषणकडून बांधण्यात येत असलेल्या विद्युत उपकेंद्राची पाहणी
स्थळ: सुरवाणी ता. धडगाव


सकाळी 11.40 वाजता : कोविड -19 लसीकरणाबाबत पाहणी 
स्थळ: ग्रामीण रुग्णालय धडगाव, जि.नंदुरबार


सकाळी 11.50 वाजता – जिल्हा आढावा बैठक 
स्थळ: ग्रामीण रुग्णालय धडगाव, जि.नंदुरबार


दुपारी 12.25 वाजता – कृषि विभाग फळरोपवाटीकेची पाहणी
स्थळ: कृषि विभाग फळरोपवाटीका धडगाव, जि.नंदुरबार

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा बनावटीच्या मद्याचा बेकायदेशीर साठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोवा बनावटीच्या मद्याचा बेकायदेशीर साठा जप्त, कारवाईत सुमारे 20 लाख 98 हजारांचा मद्यासाठा जप्त, एकाला अटक, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

पार्श्वभूमी

Petrol and Diesel price | सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर, कोणतीही दरवाढ नाही


पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग 20 व्या दिवशी स्थिर राहिल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना देशात आता पेट्रोलच्या आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या आहेत हे विशेष. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47  रुपये इतकी आहे. 


Remdesivir : फक्त बाराशे रुपयात रेमडीसिवीर इंजेक्शन, ठाणे पालिकेचा निर्णय


ठाण्यात कोरोनाची संख्या वाढत असतानाच ठाणे महानगर पालिका कोरोनाच्या लढाईसाठी सुसज्ज होते आहे. ठाणेकरांना Covid-19 वर परिणामकारक असलेल्या Remdesivir - 100 mg हे इंजेक्शन आता अवघ्या 1200 रुपयांपेक्षा कमी दारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे Remdesivir - 100 mgइंजेक्शनसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.


Mumbai Corona Cases : एकवेळी सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही रुग्णसंख्यावाढीचा वेग!


 राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठलाय. सोबतच, मुंबईत एकेवेळी सर्वात मोठा हॉटस्पॉट असलेल्या धारावीतही आता रुग्णसंख्यावाढीनं वेग घेतलाय. धारावीमध्ये कोरोनाला नियंत्रणात आणण्यात महापालिकेला यश आले असले तरी पुन्हा पुन्हा एकदा या आजाराने उचल खाल्लेली पाहायला मिळत आहे. काल या भागात तब्बल 30 रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी 33 रुग्ण आणि त्यापूर्वी 1 जून रोजी 34 रुग्ण समोर आले होते. परंतु त्यानंतर या भागातील रुग्ण संख्या एकेरी आकड्यात आली होती.


'वकिलांशी भेटीच्यावेळी एनआयए अधिकाऱ्यांची उपस्थिती नको' सचिन वाझे यांची कोर्टात नवी याचिका


आपल्या वकिलांशी बोलताना एनआयए अधिकाऱ्यांची तिथं उपस्थिती नको, अशी नवी मागणी सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टाकडे केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी अटक करण्यात आलेले आणि गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात ही नव्यानं याचिका दाखल केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.