Breaking News LIVE: सर्व केंद्र सरकारचे कर्मचारी कामाच्या दिवशी कार्यालयातील उपस्थित राहतील : केंद्र सरकार

Breaking News LIVE Updates, 14 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Feb 2021 11:41 PM
यवतमाळ- पुणे येथील वानवाडी पोलिसांचे पथकाने यवतमाळ मध्ये दाखल,पूजा चव्हाण हिने यवतमाळ च्या शासकीय रुग्णालयात उपचार घेतले का याबाबतचा तपास करण्यासाठी हे पथक आले आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता याबाबतचे पत्र सुद्धा पोलीस तपास पथकाने दिले. जयवंत जाधव याचे पथक असल्याची माहिती
धुळे एमआयडीसी परिसरामध्ये कापसाने भरलेला ट्रक ला लागली आग. आगीमध्ये ट्रकसह संपूर्ण कापूस जळून खाक. परिसरातील नागरिकांनी या संदर्भात अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर तब्बल अर्धा तासानंतर अग्निशमन विभागाचे दोन बंब दाखल. विद्युत तारेला टेकल्याने वाहनातील कापसाने घेतला पेट
सर्व केंद्र सरकारचे कर्मचारी कामाच्या दिवशी कार्यालयातील उपस्थित राहतील, सरकारचा आदेश
राज्यात आज 3365 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3105 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1978708 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 36201 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.7% झाले आहे.
#CoronaVirusUpdates
सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दबावाखाली गुन्हे दाखल केलेले आहेत. जिल्हा पोलीस अनैतिक व अनधिकृत धंद्यांना पाठिंबा देत आहेत. ओरोस येथे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर माजी खासदार निलेश राणे यांच्या पुतळ्याबाबत घटना घडत होती, तेव्हाच पोलिसांनी अडवले असते तर आज जिल्ह्यात वाद चिघळला नसता. जिल्हयात शिवसेनेला पोलीस सॉफ्टकॉर्नर देत असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. जिल्ह्यात शिवसेनेने माजी खासदार निलेश राणे आणि भाजपाने खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळला होता. मात्र जिल्ह्यात खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली उद्या सोमवारी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेणार आहेत.
पालघर : पालघर मनोर रस्त्यावर नंडोरे येथे टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला. विनोद कुकवेयर कंपनीजवळ अपघात झाला. टेम्पोमधील 10 ते 12 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. टेम्पो पालघरहून चाहडे नाका येथे जात होता. उपचारासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
वाशिमच्या तोंडगावं फाट्याजवळ अकोला हैद्राबाद मार्गावर अमृत सिंग कपूर स्टोन क्रेशर तोंडगावं इथं गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका डंपरला शॉर्टसर्किटमुळे आग लागून डंपर जळून राख झाल्याची घटना घडली. मात्र या घटनेत कोणतीच जीवितहानी किंवा कुणीच जखमी झालं नाही.
15 वे मराठी विद्रोही साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर. 25 आणि 26 मार्चला नाशिकमध्ये पार पडणार संमेलन, ठिकाण अद्याप निश्चित नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला बहिष्कार टाकून हे संमेलन भरवणार. कायदेशीर सल्ला घेऊन ग्रेटा थनबर्गच उद्टनाला येईल यासाठी प्रयत्न सुरु. विद्रोही साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी यांची माहिती.
पुण्यातील लवासा प्रकल्पातील कॉलेजमध्ये शिकणारी दोन मुलं वरसगाव धरणात बुडाली. लवासा प्रकल्प ज्या वरसगाव धरणाच्या काठावर उभारण्यात आलाय त्या धरणात लवासातील ख्राईस्ट युनिव्हर्सिटी कॉलेजमधे शिकणारी चार मुलं आज सकाळी पोहायला गेली होती. त्यापैकी दोन मुलं पोहताना बुडाली. निहाल थापा - मुळ राहणार शिलॉंग, मेघालय आणि सी. रक्षीत - मुळ राहणार चेन्नई अशी या दोघांची नावं आहेत. आपत्ती निवारण पथक आणि लवासातील रेस्क्यु टिम कडून या दोघांचा शोध घेतला जातोय.
कोल्हापुरात अंबाबाई मंदिराजवळील बाबूजमाल परिसरत राडा. चारचाकी गाडी अंदाधुंदपणे चालवणाऱ्या चालकास जमावाने बेदम चोपलं. वाहतूक पोलिसाने पाठलाग करून वाहन चालकाला पकडलं. जमावाने चारचाकी गाडीच्या काचाही फोडल्या. ताराबाई रोड-बाबू जमाल परिसरत तणाव.
पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर बुरुजावर पडलेला मोबाईलचा चार्जर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा दरीमधे पडून मृत्यू झालाय. अनिरंग राक्षे, असं या तरुणांच नाव असुन तो मुंबईहून मित्रांसह ट्रेकींगसाठी राजगड किल्ल्यावर आला होता. किल्ल्यावर जाताना हातातून निसटून बुरुजावर पडला. तो चार्जर काढण्यासाठी अनिरंग बुरुजावर उतरण्याचा प्रयत्न करताना पाय घसरून दरीमधे पडला. स्थानिक तरुणांनी दरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढला आणि त्याच्या मित्रांकडे सोपवला.
गडहिंग्लजमध्ये आमरण उपोषणाला बसलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली. प्रकृती खालावलेल्या आंदोलकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन. निवृत्तीनंतरचे सर्व लाभ मिळावेत यासाठी टोकाचे आंदोलन. महिनाभरापासून वेगवेगळ्या माध्यमातून समस्या मांडली. उद्या कर्मचारी संघटनेच्या वतीने गडहिंग्लज बंदची हाक.
नांदेड : जिल्ह्यात आज पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला असून त्या महागाईचे चटके आज सर्वसामान्य नागरिकाना सोसावे लागत आहेत. कारण आता पेट्रोल ,डिझेल दरवाढीत नांदेड ने ही उच्चाक गाठून 100 गाठलीय. कारण नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे आज महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकल्या जात आहे. कारण धर्माबाद येथे पेट्रोल चे दर 98.28 रुपये व डिझेल 87.70रुपयापर्यंत पोहचलेय.


चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळ्या प्रकरणी अखेर पोलिसांनी दाखल केला गुन्हा, अपहार प्रकरणी रोखपाल निखिल घाटे याच्यावर पोलिसांनी दाखल केला गुन्हा, या अपहारात बँकेचे आणखी काही कर्मचारी सहभागी आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.
एपीएमसी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भूषण पवार हे गेल्या दोन महिन्यापासून रजेवर होते. आज एपीएमसी पोलीस ठाण्यात हजर होण्यासाठी आले होते. मात्र, प्रत्यक्षात चार्ज घेण्याआधीच त्यांनी पोलीस ठाण्यातील एका रूममध्ये स्वतःवर गोळी झाडली. छातीमध्ये गोळी लागल्याने त्यांचा रक्तस्त्राव झाला होता. एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना मृत घोषीत करण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून भूषण पवार हे तणावात असल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्येचे नेमके कारण अजून समोर आले नसले तरी घरगुती वादातून प्रकार घडला अयल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
गडहिंग्लजमध्ये आमरण उपोषणाला बसलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रकृती खालावली. प्रकृती खालावलेल्या आंदोलकांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन. निवृत्तीनंतरचे सर्व लाभ मिळावेत यासाठी टोकाचे आंदोलन. महिनाभरापासून वेगवेगळ्या माध्यमातून समस्या मांडली. उद्या कर्मचारी संघटनेच्या वतीने गडहिंग्लज बंदची हाक.
मंत्री विजय वडेट्टीवार आणि ठाकरे सरकार विरोधात उद्या साधु संतांचा शंखनाद :
आचार्य तुषार भोसलेंची घोषणा
उद्यापासून टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य, फास्टॅग लोकानी काढून घ्यावे, आता मुदतवाढ मिळणार नाही : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
राज्यपालांसोबत शीतयुद्ध सुरु नाही तर खुलं वॉर सुरु असल्याचं प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. राज्य सरकारचे अनेक निर्णय राज्यपालांमुळे रखडल्याचा सांगत राज्यपाल भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय.
नांदेड आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच 06 बी डब्ल्यू 4413 काल रात्री 11 वाजताच्या नांदेड-हैदराबाद फेरीवर धावत असताना आज सकाळी 4 वाजता कामारेड्डी (तेलंगणा राज्य) येथे सदर बस रस्त्याच्या खाली उतरून 2-3 पलट्या घेऊन भीषण अपघात झाला आहे. सदर बसमध्ये अपघातावेळी एकूण 36 प्रवासी होते. या अपघातात 17 प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून चालकाच्या डोक्याला मार लागला व वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झालीय.
विद्यापीठाच्या खर्चातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे कार्यक्रम, हा विद्यार्थ्यांच्या पैशाचा अपव्यय - अभाविपचा आरोप,

वरळीत होणारा उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आयोजनाची जबाबदारी मुंबई आणि एसएनडीटी विद्यापीठावर का ?- अभाविपचा सवाल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन दररोज लाखो रुपयांची गोवा बनावटीची दारू राजरोसपणे वाहतूक केली जाते. गोव्याहून नाशिकच्या दिशेने आयशर टेम्पोमधून सुरू असलेली दारू वाहतूक सिमा शुल्क विभागाच्या पथकाने ओसरगाव मध्ये रोखली. मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली मधील ओसरगांव येथे कारवाईत ३० लाखांहून अधिक रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले होते.
पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्यात लाखो मासे मृत,

दूषित पाण्यामुळे मासे मृत होण्याचं प्रमाण वाढलं,

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रदूषण नियंत्रण मंडळावर ठपका,

नदी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी
मध्य रेल्वे दिनांक १४.२.२०२१ रोजी देखभाल व दुरुस्तीचे कार्य करण्यासाठी उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे.

माटुंगा - मुलुंड अप व डाऊन जलद मार्ग सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत

सकाळी १०.२५ ते दुपारी ३.४४ या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील आणि शीव व मुलुंड दरम्यान संबंधित निर्धारित थांब्यावर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा आपल्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.

सकाळी १०.४६ ते दुपारी ३.२६ या वेळेत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील आणि मुलुंड ते दादर स्थानकांदरम्यान आपल्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप जलद सेवा परळ येथे पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि
चुनाभट्टी / वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

सकाळी ११.३४ ते दुपारी ४.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर सेवा आणि सकाळी ९.५६ ते दुपारी ४.४३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून वांद्रे / गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल / बेलापूर / वाशी येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०.४५ ते दुपारी ४.५८ पर्यंत गोरेगाव / वांद्रे येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.
जालना- भरधाव कार विहिरीत कोसळली, आईसह चार वर्षाच्या मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू,.गाडीतील इतर 3 जनांना वाचवण्यात यश, औरंगाबादहून शेगावला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत विहिरीत कोसळली, दोन दिवसांपूर्वी याच विहिरीत दोन जणांचा कारसह बुडून मृत्यू
सलग 6 व्या दिवशी इंधन दरात वाढ,
पेट्रोल - 28 पैशाची वाढ ,
डिझेल - 34 पैशाची वाढ ,

मुंबईमध्ये
पेट्रोल - 95.19 रुपये ,
डिझेल - 86.02रुपये

पार्श्वभूमी

11 वी प्रवेशासाठी शेवटची संधी, 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
मुंबई : अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आला नाही आहे, त्यांना प्रवेश निश्चित करता यावेत यासाठी, 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.

Lockdown | कोरोना रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो : छगन भुजबळ
नाशिक : "अनेक देशातील पुन्हा लॉकडाऊन होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य आहे," असं वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आलेत. तसं होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीतून जे सत्य जनतेसमोर येईल त्यानंतर कारवाई केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.