राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


 


Ratnagiri Refinery Survey: बारसूमधील आंदोलक आक्रमक, सर्वेक्षणच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न, पोलिसांनी अडवल्यानं वातावरण निवळलं


Ratnagiri Refinery Survey: रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri News) राजापूर तालुक्यातील (Rajapur Taluka) बारसूमध्ये (Barsu) वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आजही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशातच काही वेळापूर्वी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं. अखेर आंदोलकांना पोलिसांनी अडवलं आणि वातावरण निवळलं. वाचा सविस्तर


Shirdi: शिर्डी बंदचा निर्णय तुर्तास मागे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांचा निर्णय


अहमदनगर: महाराष्ट्र दिनापासून म्हणजे एक मेपासून साईबाबांच्या शिर्डीत बेमुदत बंद पाळण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.  साई मंदिरातल्या प्रस्तावित सुरक्षाव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन शिर्डीमध्ये वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळत होते. विखे पाटलांसोबतच्या भेटीनंतर शिर्डी बंदचा निर्णय मागे घेण्यात आळा आहे. वाचा सविस्तर


Raj Thackeray Hate Speech Case: राज ठाकरेंना दिलासा; बोकारो कोर्टाचं भडकावू भाषणासंदर्भातलं समन्स दिल्ली हायकोर्टाकडून रद्द


Raj Thackeray Hate Speech Case: दिल्ली हायकोर्टाकडून (Delhi High Court) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिलासा दिला आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात बोकारो कोर्टानं राज ठाकरेंना समन्स बजावलं होतं. याप्रकरणी सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टानं समन्स रद्द केलं आहे. वाचा सविस्तर


ABP C Voter Survey : अजित पवार यांच्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे? सर्वेक्षणातून जनतेनं दिलाय धक्कादायक कौल


ABP C Voter Survey: शिवसेनेतील (Shiv Sena) बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळीच कलाटणी मिळाली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. न भूतो, न भविष्यती अशा अनेक घटना राज्याच्या राजकारणात घडताना पाहायला मिळाल्या. शिवसेनेत प्रबळ नेते समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) काही आमदारांसह बंड केलं आणि भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. राज्यात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री पदी विराजमान झाले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis). पण आता चित्र काहीसी बदलंलं आहे. बंडानंतर चर्चेत असलेले एकनाथ शिंदे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. तसेच, राज्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? यासंदर्भातही चर्चा सुरू आहेत. वाचा सविस्तर 


ABP C Voter Survey : एकनाथ शिंदे पदावरुन पायउतार झाले, तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? जनतेचा कौल ठाकरेंनाच


ABP C Voter Survey On Eknath Shinde: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) प्रचंड उलथा-पालथ पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदासाठी अनेक दावेदार समोर येत आहेत. शिवसेनेतून बंड करत भाजपच्या (BJP) साथीनं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) पदी विराजमान झाले. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात सत्तासंघर्षाचा पहिला अंक रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे असं वातावरण पाहायला मिळालं होतं. राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष एकनाथ शिंदेंवर होतं. अशातच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चर्चेचा विषय बनले आहेत. वाचा सविस्तर