राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील 


शाळा म्हणायचं की दलाल? गणवेश सक्तीमागे दलालीचं वास्तव, शाळांना मिळतं 10 टक्के कमिशन, 'एबीपी माझा'चं खळबळजन स्टिंग ऑपरेशन 


गणवेश विक्रेते या शाळाचालकांना 10 टक्के कमिशन देतात. वर्षाला हजारो गणवेशांचा खप होतो. त्यामुळे कमिशनचा हा खेळ कोट्यवधींमध्ये जातो. या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) स्टिंग ऑपरेशन केलं. आणि यामध्ये हे सगळं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. (वाचा सविस्तर)


अजितदादांना मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही; राष्ट्रवादीच्या आमदाराची भीमगर्जना 


वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश पाटील यांनी भीमगर्जना केली आहे. अजितदादांना (Rajesh Patil on Ajit Pawar) मुख्यमंत्री करत नाही, तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही, असा निर्धार त्यांनी अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलून दाखवला. (वाचा सविस्तर)


रुग्णवाहिका नाही, शवगृहही बंद, नातेवाईकांनी आजीचा मृतदेह रात्रभर रिक्षातून फिरवला; स्मार्ट पुण्यातील सावळा गोंधळ


स्मार्ट सिटी पुण्यात मृत्यूनंतरही मृतदेहाची (Pune crime news) थट्टा सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका कुटुंबीयांना सोयी सुविधा वेळेत न मिळाल्याने मृतदेहाला कुटुंब रात्रभर रिक्षात घेऊल फिरावं लागलं आहे. आजीचा मृत्यू झाल्यानंतर पुढील प्रक्रिया करण्यासाठी कुटुंबाला ना ॲम्बुलन्स मिळाली, ना शवगृह मिळालं. पुणे शहरातील कॉन्टेन्टमेन्ट भागातून हा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे कुटुंबियांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप व्यक्त  केला आहे. (वाचा सविस्तर)


जन्मदात्या बापानेच 75 हजारांची सुपारी देत मुलाचा केला खून; अवघ्या काही तासांतच खुनाचा उलगडा 


जन्मदात्या बापानेच सुपारी देत मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली. पोलिसांनी काही तासांमध्येच या प्रकरणाचा उलगडा करत तिघांना ताब्यात घेतलं आहे  तारदाळमध्ये (ता. हातकणंगले) ही घटना घडली. राहुल दिलीप कोळी (वय 31 रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. दिलीप कोळी आणि विकास पोवार (दोघे रा. तारदाळ), सतीश कांबळे (रा. तमदलगे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. (वाचा सविस्तर)


नाशिकच्या बाल तस्करी प्रकरणाचा तिढा अखेर सुटला; तीसही बालकं बिहारला रवाना  


 गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकसह (Jalgaon) जळगाव जिल्ह्यात चर्चेत असलेला बाल तस्करी प्रकरणाचा तिढा अखेर सुटलेला आहे. नाशिकच्या मनमाड येथून ताब्यात घेतलेल्या मुलांना पुन्हा बिहारला माघारी पाठविण्यात आले आहे. आज सकाळी नाशिकरोड येथून रेल्वेच्या माध्यमातून सदर मुलांना गावी रवाना करण्यात आले. त्यामुळे मुलांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.  (वाचा सविस्तर)