School Uniform Sting Operation News: आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी पालक जीवाचं रान करतात. कधी ओव्हारटाईम करून तर कधी काटकसर करून आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च ते करत असतात. पण शिक्षणाच्या नावाखाली याच पालकांची कशी लूट होते, ते आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शाळेचा गणवेश विशिष्ठ दुकानातूनच घ्यायचे अशी सक्ती अनेक शाळांकडून केली जाते. पण यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? एकच कारण आहे, आणि ते म्हणजे कमिशन. गणवेश विक्रेते या शाळाचालकांना 10 टक्के कमिशन देतात. वर्षाला हजारो गणवेशांचा खप होतो. त्यामुळे कमिशनचा हा खेळ कोट्यवधींमध्ये जातो. या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) स्टिंग ऑपरेशन केलं. आणि यामध्ये हे सगळं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.


सध्या शाळांचा सीजन सुरु असून, अनेक दुकानांमध्ये मुलांच्या शाळेचे ड्रेस खरेदी करण्यासाठी पालकांची मोठी गर्दी आहे. पण या गर्दीच कारण आहे संस्थाचालक सक्ती. कारण बहुतांश शाळांकडून विशीष्ट दुकानातूनच ड्रेस खरेदी करण्याची सक्ती केली जाते आणि यामागे संस्थाचालक आणि दुकानदारांचा टक्केवारीचा खेळ असतो. छत्रपती संभाजीनगर शहरातील अशाच काही दुकानदारांचं एबीपी माझानं स्टिंग ऑपरेशन केलं आहे. 


लाखांमध्ये फीस घ्यायची तरी देखील मुलांच्या पेन्सीलपासून, सॉक्स, बूट ते लहान मुलांच्या रुमालापासून देखील कमिशन खाणारे हे संस्थाचालकांचा भंडाफोड या स्टिंग ऑपरेशनने केला आहे. आता आम्ही ज्यांचं स्टिंग केलं त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तो मी नव्हेच या भूमिकेत त्यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिकिया दिल्या आहेत.


स्टिंग ऑपरेशन 1


दुकानदार : मै भी दो पैसे कमाने बैठा हू, समाज थोडी ना सेवा करणे बैठा हू खुल्ली बात है


दुकानदार : 20 बच्चे है उनका सैलरी निकालना है


दुकानदार : आपको यहा के रेट दू या सप्लाय वाले रेट दू


पालक : इधर भेजो तो


दुकानदार : आपको कितना होना बोलो, उसमे वो अॅड हो जायेंगा, मुझे जेब से थोडी देना है


पालक : कितना होगा...?


दुकानदार : 10 पर्सेंट के उपर कोई नही देता यहा पर और आप 20 पर्सेंट की बात कर रहे


दुकानदार : 10 टक्के के उपर कोई स्कुल वाला नही लेता...


पालक : हमारे कुछ दोस्त के स्कुल है उनका 20 और 25 पर्सेंट है


दुकानदार : फिर ओ रेट भी वहा जा रहे होंगे फिर


पालक : यहा आने के बाद रेट


दुकानदार : कितना ऍड करना है बोल ये आप, पाच करना है, सात करना है ,दस करना है....


पालक : पालकांना नाही परवडणार...


पालक : 7 टक्के कर दो


दुकानदार : 20 और 25 निकालेगे तो रेट कहा जायेंगे


दुकानदार : पेरेंट्स यहा किचकिच करते है, हम सूनकर ले ते है


पालक : कपडे मे मार्जिग रहता है ना


दुकानदार : छोड दो सर, कॉम्पिटिशन इतना हेवी चल रहा है ना...


पालक : आप का यहा कितना था,उसमे।सात टक्का


दुकानदार : अलमोस्ट 270 या 275 तक टिशर्ट जायेगा


पालक: मॅक्झिमम स्कूल कितना करता बोले आप


दुकानदार : 10 ....


पालक : 10 के उपर नाही जाता


दुकानदार : है एकदा दुसरा 15 भी लेते, लेकिन रेट भी फिर वैसे जाते


पालक : फेस कैसे करते फिर


दुकानदार :हम लोग फेस करते


पालक : अच्छा ओ 15 लेकर आप के पास भेज देते है, फिर आप कैसे फेस करते है


दुकानदार : कुछ भी नही, नीचे मुंडी रखने की और सुनने का....


दुकानदार : भाव का काम ही नही मेरे पास, एक रुपया भी कम नही हो था है....


स्टिंग ऑपरेशन 2 


पालक : आपण स्कूल युनिफॉर्म बनवतो का


दुकानदार : हो बनवतो ना सर...


पालक : आपल्याकडे कोणत्या कोणत्या शाळा आहे


दुकानदार : एस एफ एस, जेवियर्स, सरस्वती भवन, अतुल वाघमारे, शारदा विद्यामंदिर, सुसू विहार, ज्ञानमंदिर अनेक शाळा आहे


पालक : वाळूजमध्ये कोणाला आहे


दुकानदार : बजाजनगरच्या एक दोन दुकाने आहेत, ते आपल्या बीड बायपासच्या दुकानातून नेतात


पालक : आमचं लिटिल क्रिस नावाने आहे, 350 मुलं असती


पालक : आम्हाला प्रत्येकी दोन ड्रेस हवे आहेत, एक स्पोर्ट्स आणि एक जनरल


दुकानदार : तुम्हाला बल्कमध्ये पाहिजे की कसं?


पालक : तुमच्याकडून कसे होणार? तुम्ही जर म्हटले की स्कुलवर सप्लाय करू किंवा पेरेंट्स ला इथे पाठवा... तुम्हाला देखील सर्वेसला अडचण नको


दुकानदार : फरक असा असतो की आम्ही तुम्हाला होलसेलमध्ये देणार, तुम्हाला काय रेटने विकायचं तुमचं मार्जिन ऍड करून तिकडे सेल करू शकतात


दुकानदार : जर माझ्या काउंटरवर आले तर माझे जे एमआरपीचे रेट आहेत त्यात सेल करू


पालक : त्यात स्कुलला काय मिळणार?


दुकानदार : तुम्हाला 10 टक्के


दुकानदार : आम्ही सर्वांना तेच देतो, 10 टक्क्यांच्या वर आम्ही जातचं नाही...


पालक : 20 ते 25 आकडा आला होता मला,


दुकानदार : देशमुख इंटरनॅशनल स्कूल आहे नक्षत्रवाडीला, त्यांना देत होतो 20 टक्के,


दुकानदार : आमचं कॉलिटी सर्विसचा जो पार्ट आहे, ते मागत होते पण आम्ही रिजेक्ट केलं


दुकानदार : 15 टक्के सुद्धा आम्ही देणार नाही 10 टक्के आमचं फिक्स आहे...


दुकानदार : माझे रेटच रिझनेबल आहेत. करतानाच आपण 10 टक्के करतो आणि तेव्हडे देतो


दुकानदार : आता टीएमसी आहे,साडेतीन हजार विद्यार्थी आहे, त्यांना साडेसात टक्के देतो,युपीएसला तर 1 टक्का सुध्दा देत नाही


दुकानदार: शर्टवर बब्लिग आल्यावर कोटीशनवर रिप्लेस गॅरंटी आहे. चेंज करणार


पालक: ज्यांना टक्केवारी देतात त्यांचा रिप्लेसमेंट नाही होणार का?


दुकानदार : त्यांचा देखील होणार. पण त्यांचे रेट वाढणार. आता शेवटी मी खिशातून तर कमिशन देणार नाही. जे तुमच्याकडून येणार त्याच्यातूनच कमिशन देणार. पालकांकडून येईल ते तुम्हाला देईल. कोणताही व्यापारी डिस्काउंट किंवा कमिशन खिशातून देत नाही. तो पास ऑन करणारच. तुमच्या विद्यार्थ्यांचे जे पेरेंट्स आहे ते माझ्याकडे येतील. मी त्यांना जे एक्स्ट्रा चार्ज करेल, तेच तुम्हाला देईल. हे असं चालूच असतं. मी जी गोष्ट शंभर रुपयाला विकतोय,मुळात मी ती 90 ला विकतो पण सांगताना शंभर सांगतो.


पालक: माझं मत होतं पालकांना त्रास न देता आपल्यात काही होईल का


स्टिंग ऑपरेशन 3 


पालक : तुमच्याकडे एक स्कुल आहे त्यांनी मला 15 टक्के होईल सांगितले


दुकानदार : नाही, कोणत्याच शाळेला देत नाही


दुकानदार : कोणत्याच शाळेला एवढ देत नाही, नाहीतर मी पण सांगितले असते ठीक आहे त्यांना देतो तर तुम्हाला देखील देतो


दुकानदार : आठ दहा वर्षे झाले मी दुकानच काम बघतोय, पप्पा 40 वर्षांपासून स्कूल युनिफॉर्म चा बिजनेस करतात. तेव्हापासून दहा टक्केच्या वरती कुणालाच दिलं नाही. कितीही मोठी ऑर्डर असू द्या..


दुकानदार : मोईन उलूम नावाची शाळा आहे बीड बायपासला, त्यांच्याकडे साडेतीन-चार हजार विद्यार्थी आहे. त्यांना देखील पाच टक्के देतो आपण. 


दुकानदार : ज्यांना कॉलिटीची कदर आहे ते घेतात. पण ज्यांना फक्त कमिशन हवंय त्यासाठी, साकला आहे, पॉएजन वाले आहेत ते देतात 20 ते 25 टक्के...