एक्स्प्लोर

कोल्हापूर-सांगली पूरस्थितीवरील याचिका हायकोर्टाने निकाली काढली

महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली इथे ओढावलेल्या महापुराच्या भीषण परिस्थितीला प्रशासनाचा गलथानपणा तसंच धरणातील पाणी सोडण्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका, राष्ट्रीय जनआंदोलन समन्वयाचे सदस्य रावसाहेब अलासे आणि पत्रकार राजेंद्र पाटील यांनी ऍड. धैर्यशील सुतार यांच्यावतीने दाखल केली होती.

मुंबई : सांगली-कोल्हापुरातील पूरस्थितीवरील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढली आहे. या घटनेची जबाबदारी ठरवून चौकशीचे आदेश देण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यामुळे यासंदर्भात काय कारवाई करावी, याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली इथे ओढावलेल्या महापुराच्या भीषण परिस्थितीला प्रशासनाचा गलथानपणा तसंच धरणातील पाणी सोडण्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका, राष्ट्रीय जनआंदोलन समन्वयाचे सदस्य रावसाहेब अलासे आणि पत्रकार राजेंद्र पाटील यांनी ऍड. धैर्यशील सुतार यांच्यावतीने दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर यावर बुधवारी (11 सप्टेंबर) सुनावणी झाली. कर्नाटक राज्याच्या धर्तीवर पूरग्रस्तांना नुकसाभरपाईचे आदेश देण्यात यावेत, अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय लाखे-पाटील यांनीही काही दिवसांपूर्वीं मुख्य न्यायमूर्तींना यासंदर्भात पत्रही लिहिलं होतं. कोल्हापूर आणि सांगली मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आणि उद्भवलेल्या महापुराने थैमान घातलं. त्यात सुमारे 40 जणांचा बळी गेला आणि लाखो लोक बेघर झाले. लाखो हेक्टर शेती जमीन पाण्याखाली गेली, कोट्यावधींचे नुकसान झाले. याला प्रशासनाचा गलथानपणा, कृष्णा खोऱ्यातील कोयना, अलमट्टी तसेच इतर धरणातील पाणीसाठा सोडण्यात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशाचे झालेले उल्लंघन तसेच कर्नाटक सरकारशी महाराष्ट्र सरकारचा समन्वयचा अभाव या गोष्टी कारणीभूत असल्याचा आरोपही याचिकेमार्फत करण्यात आला होता. पाण्याचे गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप कृष्णा खोऱ्यातील कोयना आणि अन्य धरणे केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात प्रत्येक धरणात 50 टक्के पाण्याची साठवणूक करणे अपेक्षित असतं. मात्र आयोगाच्या या निर्देशाकडे तसेच हवामान खात्याने वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजाकडे महारष्ट्रातील पाटबंधारे खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. अलमट्टी धरणातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधला नाही. त्यातच मुसळधार पावसामुळे धरणातून एकाचवेळी पाणी सोडण्यात आल्याने पूरस्थिती निर्माण झाली. यात एकाबाजूला महापालिका, नगरपालिकांचा भोंगळ कारभार तर दुसऱ्या बाजूला बिल्डरांशी हात मिळवणी करत नदीपात्रात उभारलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे नदीचा प्रवाह बदला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget