Samir Bangara | समीर बंगारा यांचं बाईक अपघातात निधन
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दर शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात बाईक रायडिंगसाठी राईडर्स येत असतात. समीर बंगारा हे क्यू युकी या कंपनीचे सहमालक आणि व्यवस्थापकीय संचालक होते.
पालघर : 'क्यू युकी' कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर बंगारा (42) यांचे बाईकला झालेल्या भीषण अपघातात निधन झालं आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हालोली येथे हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की समीर बंगारा यांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दर शनिवार आणि रविवारी मोठ्या प्रमाणात बाईक रायडिंगसाठी राईडर्स येत असतात. आत्तापर्यंत असे अनेक अपघात याठिकाणी घडले आहेत. समीर बंगारा हे क्यू युकी या कंपनीचे सहमालक आणि व्यवस्थापकीय संचालक होते. तसेच जगप्रसिद्ध वर्ल्ड डिस्ने कंपनी इंडिया लिमिटेड कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते.
Just heard that @samirbangara is no more. Horrible, heartbreaking news. Man's been a friend for a long time. Such a good guy, so straight-up. Helped so many people build careers out of nothing! His legacy will remain.
Much love & strength to the family. ???????? 2020, enough please! — VISHAL DADLANI (@VishalDadlani) June 14, 2020
समीर यांच्या निधनानंतर संगीतकार विशाल ददलानीने ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. विशालशिवाय गायक अदिती सिंह शर्मा, अशोक पंडित यांनीही ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली.
Shocked to hear about the untimely demise of @samirbangara. Deepest condolences to his family and the @MyQyuki team. ॐ शांति। ???????? pic.twitter.com/h6GAk4oxuw
— Ashoke Pandit (@ashokepandit) June 14, 2020