एक्स्प्लोर
बुलडाण्यात शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांच्या कार्यालयाबाहेर स्फोट

बुलडाणा: बुलडाण्यातील शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर स्फोट झाल्यानं एकच खळबळ उडाली. काल रात्री साडे आठच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटात 2 श्वान ठार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या स्फोटामागे घातपात आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, या स्फोटामुळे बुलडाणा शहरात काही वेळ भीतीचं वातावरण होतं. दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. तसेच या स्फोटामागे घातपाताचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाबाबत बुलडाणा पोलीस कसून चौकशी करत आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक





















