एक्स्प्लोर
Palghar Blast | तारापूर एमआयडीसीतील कंपनीत स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू
तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी आणि मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

पालघर : तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर एम 3 मधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट कंपनीत भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गॅलेक्सी सरफॅक्टटंट या कंपनीमध्ये आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. विजय पांडुरंग सावंत, समीर शहाबुद्दीन खोजा अशी मृतांची नावं आहेत. तर रुणाल प्रभाकर राऊत हे जखमी झाले आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट एम-3 मध्ये गॅलेक्सी सरफॅक्टटंट ही कंपनी आहे. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास इथे भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, सध्या लॉकडाऊनमुळे कंपनीच्या बाजूच्या बहुतांश कंपन्या बंद असल्याने या स्फोटाचा आवाज सुमारे पाच किमीवर असलेल्या नांदगाव व मुरबे गावांपर्यंत ऐकू आला. तारापूर एमआयडीसी अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले असून गंभीर जखमी आणि मृतांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.
Before You Go
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















