एक्स्प्लोर

आदित्य ठाकरेंना छोटा पेंग्विन म्हणणाऱ्या समितच्या समर्थनार्थ भाजयुमोचं अनोखं आंदोलन

मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विटरवर छोटा पेंग्विन संबोधणाऱ्या समित ठक्करच्या बाजूने भारतीय जनता युवा मोर्चा अनोख्या पद्धतीने आंदोलनात उतरला आहे.ठाकरे सरकार महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत असल्याचं आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.

नागपूर :  मंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विटरवर छोटा पेंग्विन संबोधणाऱ्या समित ठक्करच्या बाजूने भारतीय जनता युवा मोर्चा अनोख्या पद्धतीने आंदोलनात उतरला आहे. नागपूरच्या आकाशवाणी चौकात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पेंग्विनचे पोस्टर गळ्यात घालून अनोखे आंदोलन केले. ठाकरे सरकार महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालत असल्याचं आरोप या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.

सोशल मीडियावरून आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या समित ठक्करला अटक केल्यानंतर त्याला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात आहे. दोऱ्यांनी बांधून न्यायालयात नेले जात आहे, असा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला. महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त काही लोकांनाच आहे का असा प्रश्न सुद्धा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. आकाशवाणी चौकात झालेल्या या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पेंग्विनचे पोस्टर गळ्यात घालून आले होते.

ट्वीटरवर मंत्री आदित्य ठाकरे यांना पेंग्विन तर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार म्हणणाऱ्या समीत ठक्कर या तरुणाला नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावली आहे. नागपूर पोलिसांनी 24 ऑक्टोबरला समीत ठक्करला राजकोटमधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबरला न्यायालयाने समीत ठक्करला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यावर परवा संध्याकाळी पुन्हा एकदा समीत ठक्करला न्यायालयात उपस्थित करण्यात आले. तेव्हा या प्रकरणात आणखी तपास शिल्लक असल्याच्या पोलिसांच्या युक्तिवादाला मान्य करत न्यायालयाने समीत ठक्करला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अवघ्या 32 वर्षांच्या समीत ठक्करला ट्विटर वर तब्बल 60 हजार लोकं फॉलो करतात. यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेलमंत्री पियुष गोयल आणि भाजपचे अनेक मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे समीतला अटक झाल्यापासून राज्यातील भाजप नेत्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा पुढे करत आम्ही समीत ठक्करच्या बाजूने मैदानात आहोत, असे वक्तव्य केले होते. त्याच वेळेस समीत आमचा कार्यकर्ता नाही, असेही भाजपने स्पष्ट केले होते. जर सोशल मीडियाच्या माध्यमातून एक तरुण सरकारवर मुद्देसूद टीका करत असेल, सरकारच्या चुका चव्हाट्यावर आणत असेल आणि सरकार त्याला अटक करत असेल. तर त्या तरुणाच्या बाजूने आम्ही उभे राहू अशी प्रतिक्रिया भाजपने दिली होती.

आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करला अटक, पंतप्रधान मोदी करतात फॉलो

गेल्या एका आठवड्यात महाराष्ट्रात भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विटरवर समीत ठक्करला पाठिंबा दर्शवत "फ्री समीत ठक्कर" हे हॅशटॅग वापरत ट्विट केले आहे. त्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून ट्विटरवर भाजप आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये आधीच वाद प्रतिवाद सुरु आहे. आता समीतच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ झाल्याने समीत ठक्करचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

साधारणपणे आयटी अॅक्टच्या प्रकरणात पोलीसही जास्त पोलीस कोठडीची मागणी करत नाहीत. मात्र, समीतच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी या प्रकरणात अजून तपास पूर्ण झालेला नाही, आरोपीकडून अजून माहिती घेणे शिल्लक असल्याचा तर्क न्यायालयापुढे मांडला गेला. यावरही ट्विटरवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त करत, हे प्रकरण शिवसेनेच्या नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी संबंधित असल्यामुळे नागपूर पोलीस जाणूनबुजून समीत ठक्करच्या जामिनाला विरोध करत असल्याचे काहींचे मत आहे.

कोण आहे समीत ठक्कर? 32 वर्षांचा नागपूरचा तरुण समीत ठक्कर ट्विटर वर प्रचंड सक्रिय आहे. नागपूरच्या व्हिएमवी कॉलेजमधून त्याने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले असून त्याच्या कुटुंबाचा नागपुरात ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. समीतचे ट्विटर वर 60 हजार फॉलोवर्स आहेत. समीत जरी भाजप नेते फोलो करत असले तरी समीत आमचा कार्यकर्ता नाही, तो पक्षाच्या कुठल्याही व्यासपीठावर पक्षाशी थेट संबंधित नाही, असे भाजपने स्पष्ट केले आहे. तर समीत भाजपच्या आयटी सेलचा कार्यकर्ता असल्याचे आरोप शिवसेनेने केले आहे. समीतचे एक काका कधी काळी शिवसेनेचे स्थानीय नेते राहिले आहे. मात्र, आता ते पक्षात नाहीत.

मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्र्यावर टीका गेले अनेक आठवडे समीत ठक्कर महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत होता. कोरोनाचा वाढत संक्रमण असो, वैद्यकीय सेवांमधील गौडबंगाल असो, पूर्व विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी निर्माण झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान या सर्व मुद्द्यांना घेऊन त्याने अनेक ट्विट्सच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केली होती. एवढेच नाही तर ठाकरे सरकारचा उल्लेख सतत मॉर्डन औरंगजेब, पॉवरलेस सरकार असा ही केला होता. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना छोटा पेंग्विन संबोधत ट्विटरवर अनेकवेळा त्यांची खिल्लीही उडविली होती. त्यामुळे शिवसैनिकांनी समीत ठक्कर विरोधात 12 ऑगस्टला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यावर कारवाई करताना पोलिसांनी 24 ऑक्टोबरला त्याला गुजरातमधील राजकोट मधून ताब्यात घेत नागपूरला आणले होते.

VIDEO | आदित्य ठाकरेंना बेबी पेन्ग्विन म्हणणाऱ्या समित ठक्करला अटक,पंतप्रधान मोदी करतात फॉलो

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget