Chandrashekhar Bawankule criticizes Supriya Sule : महिला दिनाच्या निमित्ताने (Women's Day 2024) मोदी सरकारने घरगुती एलपी सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Price) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, घरगुती सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयाचे स्वागत करत सरकारवर टीका केली आहे. गेल्या ९ वर्षात देशात मोदी सरकार आहे. मग, यापूर्वीच हा निर्णय का घेतला नाही, आताच सरकारने गॅस दरकपातीचा निर्णय का घेतला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. यावरून चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) हल्लाबोल केला आहे. 


सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? आज जागतिक महिला दिन आहे. हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी आज १०० रुपयांची कपात केली आहे. तुमच्या सरकारचे पेट्रोलियममं त्री वीरप्पा मोईली यांनी कोणत्या निवडणुकीच्या तोंडावर "नऊवरून 12 सिलिंडर वाढवले होते. ज्यांच्या शेतीच्या 10 एकरातून 113 कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना 100 रुपयांची माता भगिनींना दिली जाणारी भेट " निवडणूक जुमला"वाटेल, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 


 






 


चंद्रशेखर बावनकुळेंचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल


चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या माध्यमावर पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, डोक्यात सतत राजकारण असल्याने सुप्रियाताईंना काळ वेळेचे भान राहत नाही. "जुमला "शब्द मोठ्याने म्हणायचा आणि पिताश्री मंत्री असलेल्या काँग्रेस सरकारची गरीबांची, महिलांची पिळवणूक करणारी कृत्ये नजरेआड करायची. अहो, सुप्रियाताई कशाला सिलिंडरचे दर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कमी केल्याच्या बोंबा मारता? तुमचे राजकीय शिक्षक तुम्हाला सोयीचे शिकवतात.


मोदी डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाहीत


पंतप्रधान नरेंद्र मोदी डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाहीत. तो धंदा तुम्हाला पोटापाण्याला लावणाऱ्या मनमोहन सिंग नेतृत्वातील यूपीए सरकारचा होता. मोदी सरकारचे धोरण मातृवंदन आहे. तुम्हाला आठवत नाही म्हणून सांगतो, गेल्यावर्षीच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मोदीजींनी एक अभूतपूर्व निर्णय घेतला. भारतातील 75 लाख महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिले होते. इतकेच नाही, तर सर्वसामान्य गॅस ग्राहकांच्या सिलेंडरवर 200 रुपयांची कपात केली होती. आणि उज्ज्वला गॅस योजनेतील (PMUY) माता भगिनींना सिलेंडरवर 400 रुपयांची सवलत दिली होती. आठवा जरा!


...त्यांना हा निवडणूक जुमला वाटेल


आज जागतिक महिला दिन आहे.  हा मंगलयोग साधून नारीशक्तीला वंदन करण्यासाठी मोदीजींनी आज 100 रुपयांची कपात केली आहे. अर्थात, तुम्हाला हाही दिवस राजकीय वाटतो म्हणा!! आणि हो सुप्रिया ताई, एक रिपोर्ट जरूर वाचा. जेव्हा तुमच्या सरकारचे पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोईली यांनी कोणत्या निवडणुकीच्या तोंडावर " नऊवरून 12 सिलिंडर वाढवले होते..'जरूर वाचा, म्हणजे काँग्रेसी "जुमला "कळेल!! तर असो, ज्यांच्या शेतीच्या 10 एकरातून 113 कोटी रुपयांचे उत्पादन निघते त्यांना 100 रुपयांची माता भगिनींना दिली जाणारी भेट " निवडणूक जुमला"वाटेल. सुप्रियाताई, महिला दिनाच्या शुभेच्छा!!, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे एकनाथ तातडीने आज दिल्ली गाठणार; महायुती जागावाटपावर अंतिम निर्णय होणार?