Raj Thackeray Kalaram Mandir Visit नाशिक :  यंदा मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा (MNS Vardhapan Din) नाशिकमध्ये होत असल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी राज ठाकरे (Raj Thackeray) नाशकात दाखल झाले. यावेळी मनसैनिकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनी आज शुक्रवारी सकाळी काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. 


राज ठाकरे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल होत असताना त्यांचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. मंदिराबाहेर मनसेकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे, जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, असे अनेक बॅनरही परिसरात लावण्यात आले आहे. यावेळी राज ठाकरेंच्या हस्ते आरती करण्यात आली. अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी यावेळी सपत्नीक पूजा केली. 


कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचे जोरदार स्वागत 


राज ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता. राज ठाकरेंचे काळाराम मंदिर परिसरात जंगी स्वागत करण्यात आले. मंदिरात प्रवेश केल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महिलांच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. सर्वप्रथम राज ठाकरे यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. राज ठाकरेंनी यावेळी मनोभावे प्रार्थना केली. त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. अमित ठाकरे यांनी सपत्नीक पूजा केली. 


राज ठाकरेंनी साधला चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद 


दरम्यान, राम मंदिरात पूजा झाल्यानंतर राज मंदिराच्या बाहेर आलेत.  त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. राज ठाकरे यांनी चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांची पाहणी केली. तसेच या विद्यार्थ्यांना काही टीप्स देखील दिल्या. 


राज ठाकरेंचं बॅनर अज्ञातांनी फाडलं


दरम्यान, बुधवारी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) बॅनर काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आले होते. बुधवारी रात्री हे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले होते. गुरुवारी सकाळी बॅनर फाडल्याचे निदर्शनास आले. बॅनर कोणी आणि का फाडले? याचे कारण अद्याप अस्पष्ट होते. या प्रकरणी पोलीस (Police) तपास करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी! भाजपच्या डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार; मतदारसंघाची यादी आली समोर...


Loksabha Seat Sharing : जागावाटपावरून महायुतीत गडबड, भांडण; भविष्यात फारच भयानक परिस्थिती, असं थेटच कोण बोललं?