Mahashivratri 2024 : राज्यातच नाही तर देशभरात महाशिवरात्री (Mahashivratri) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला सगळीकडे महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येतो. भगवान शंकराची कृपा लाभावी यासाठी शिवभक्त या दिवशी शंकराची मनोभावे पूजा करून उपवास (Fasting) करतात.  या दिवशी सर्व शिवमंदिरांमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक केला जातो. शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले होते, असे म्हटले जाते.


 'महाशिवरात्री' ला महाराष्ट्रातील शंकराच्या या प्रसिद्ध मंदिरांना नक्की भेट द्या. 


कपालेश्वर महादेव मंदिर  - कपालेश्वर महादेव मंदिराला जवळपास सातशे वर्षांचा इतिहास आहे. नाशिक शहरात गोदावरी किनारी, रामकुंड परिसरात कपालेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे.


मार्लेश्वर मंदिर :  मार्लेश्वर मंदिर रत्‍नागिरी जिल्ह्यामधील लेणी मंदिर आहे. या मंदिराच्या शिवलिंगाला नागांनी वेढले असून ते कोणाला इजा करत नाहीत असे म्हटले जाते. 


भुलेश्वर मंदिर  : भुलेश्वर मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्राचीन हिंदू मंदिर आहे. या मंदिरच्या गर्भगृहात 5 शिवलिंग आहेत. येथील शिवमंदिराला भुलेश्वर, महादेव, यवतेश्वर मंदिरही म्हटले जाते. श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्रीला या मंदिरात प्रचंड गर्दी पाहायला मिळते.


अंबरनाथ शिवमंदिर :  अंबरनाथ शिवमंदिर हे ठाणे जिल्ह्यात आहे. हे मंदिर वडवण नदीच्या काठावर वसलेले आहे. अंबरनाथ शिवमंदिर हेमाडपंथी शैलीसाठी ओळखले जाते. या प्राचीन मंदिरात महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते. 


हरिहरेश्वर मंदिर : हरिहरेश्वर मंदिर पश्चिम घाटाच्या उंच पर्वतांनी वेढलेले आहे. भगवान शिव, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि माँ योगेश्वरी या मंदिराच्या मुख्य देवता आहेत. 


त्र्यंबकेश्वर मंदिर :  त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.  हे शिवमंदिर  नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.  हे मंदिर हिंदूंच्या श्रद्धेचे प्रमुख स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या देवता तिथे विराजमान आहेत. 


भीमाशंकर मंदिर :  भीमाशंकर मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. हे मंदिर घनदाट जंगलात वसलेले आहे. भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. असे मानले जाते की, त्रिपुरासुर राक्षसाचा नाश करण्यासाठी भगवान शंकराने भीमाचे रूप धारण केले होते.


बाबुलनाथ मंदिर :  बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. या मंदिरात भगवान शंकरासोबतच गणपती, हनुमान आणि देवी पार्वती यांच्या देखील मूर्ती आहेत.


कैलास मंदिर :  महाराष्ट्रातील वेरुळ येथे कैलास मंदिर वसलेले आहे. ही राष्ट्रकूट राजघराण्याची रचना आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ एका दगडात कोरलेले आहे. या मंदिरातील कोरीव काम या मंदिराचे सौंदर्य वाढवते.


घृष्णेश्वर मंदिर : महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात असलेले हे भगवान शंकराचे मंदिर आहे. घृष्णेश्वर मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. कैलास मंदिर दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीमध्ये बांधले गेले आहे. यामध्ये रेखीव कोरीव काम केले आहे. मंदिराच्या आतील गाभाऱ्यात भगवान शंकराचे शिवलिंग आहे, ज्यातून ते स्वतः प्रकट झाले असे मानले जाते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


महत्त्वाच्या बातम्या : 


Mahashivratri: एकादशीचा उपवास तर केला पण महाशिवरात्रीला उपवास सोडताना काय करायचं? काय सांगतात पंचागकर्ते दाते गुरूजी