एक्स्प्लोर

शिवसेनेसोबत युतीबाबत काय सुरु आहे भाजपात?

लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर 'अब की बार 220 पार' चा नारा देणाऱ्या भाजपची युतिबाबत संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची मनधरणी करुन युतीत लढलेल्या भाजपला आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची गरज आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे. याचं कारण आहे विधानसभेचा जागावाटपाच्या 50 - 50 चा फॉर्म्युला. सध्या भाजपचे 122 तर सेनेचे 63 आमदार आहेत. घटकपक्षांना 20 जागा सोडून 135-135 जागा शिल्लक राहतात. यंदाच्या विधानसभेत भाजपच्या पारड्यात फक्त 13 जागांची भर पडते आहे, तर शिवसेनेच्या वाट्याला तब्बल 72 जागा वाढत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला युतीचा मोठा फटका बसतो आहे हे सांगायला कुठल्या राजकीय पंडिताची गरज नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या अभूतपूर्व यशानंतर 'अब की बार 220 पार' चा नारा देणाऱ्या भाजपची युतिबाबत संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातं आहे. यासाठीच कालच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणूक युतीतच लढणार असल्याचं स्पष्ट केलं, मात्र मुख्यमंत्री मीच होणार असल्याचंही ठणकावून सांगितलं. याखेरीज नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही 288 जागांवर ताकदीने काम करून गरज पडेल तिथे मित्रपक्षांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांनी मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित करून शिवसेनेचे दावे उडवून लावले. शिवसेना-भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरला नाही : चंद्रकांत पाटील एकीकडे शिवसेनेकडून 50-50 टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर दावा केला जात आहे. मात्र युतीचा कोणताही फॉर्म्युला ठरला नसल्याचं भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भाजप-शिवसेनेची ज्या जागांवर सत्ता आहे, त्या जागा त्याच पक्षांनी लढवल्या पाहिजेत असं साधारण सूत्र असायला हवं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. भाजपने लोकसभेत 7 जागांवर उमेदवार बदलले, त्यावेळी आम्हाला वेड्यात काढण्यात आलं, मात्र आम्ही त्याठिकाणी यशस्वी झालो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्याप्रमाणे विधानसभेतही काही जागांवर उमेदवार बदलले गेल्यास हरकत नाही. मात्र ज्याठिकाणी शिवसेना-भाजपची सत्ता आहे, तिथे एकमेकांच्या जागांवर दावा न सांगितल्यास युतीतले बरेच प्रश्न सुटतील, असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा कुठलाही वाद नाही, शिवसेना-भाजप म्हणजे जुळे भाऊ : संजय राऊत जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपमध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत. शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात कोणताही तिढा नाही आणि मुख्यमंत्री पदासाठी कुठलाही वाद नाही. आम्ही जुळ्या भावाप्रमाणे काम करतोय, असे प्रतिपादन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांचं भविष्य, मुख्यमंत्रिपद, जागावाटप यासह विविध विषयांवर संवाद साधला. मी फक्त भाजपचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस एकट्या भाजपचाच नाही तर मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजप कार्यकारिणीच्या मुंबईत आयोजित बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस यांनी कोणत्याही पदावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात वाद नसल्याचा दावा देखील केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या वादात आपल्याला पडण्याचे कोणतेही कारण नाही. मुख्यमंत्री हा जनता निवडत असते. आपल्या मित्रपक्षांकडे खुमखुमी असणाऱ्या लोकांची कमी नाही. तरीदेखील मीच पुढचा मुख्यमंत्री असेन. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी आधीच सांगितलंय की, 'मी पुन्हा येईन, मग तुम्ही काळजी कशाला करता? मी केवळ भाजपचा मुख्यमंत्री नाही, शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच आहे. आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामसह सर्व मित्रपक्षांचा मुख्यमंत्रीदेखील मीच आहे.

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget