एक्स्प्लोर

विधानसभेत सेनेला 140 जागा देण्याचा भाजपचा प्रस्ताव : सूत्र

शिवसेनेच्या मनातील कडवटपणा काहीसा कमी होऊ शकतो, असा भाजपचा कयास आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेला चुचकारण्याच्या या खेळीमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे.

नागपूर : आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याने भाजपने याची गांभीर्याने दखल घेतली आहे. शिवसेनेने आपल्या भूमिकेपासून माघार घ्यावी, यासाठी भाजपने मांईड गेम सुरु केल्याची चर्चा आहे. येत्या विधानसभेत 288 जागांपैकी शिवसेनेला 140 जागा देऊ, असा प्रस्ताव भाजपने ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रस्तावामुळे शिवसेनेच्या मनातील कडवटपणा काहीसा कमी होऊ शकतो, असा भाजपचा कयास आहे. मात्र दुसरीकडे शिवसेनेला चुचकारण्याच्या या खेळीमुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची घोषणा शिवसेनेने आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे अर्थात येत्या काळातील निवडणुका एनडीएतून म्हणजेच भाजपसोबत न लढता, वेगळे लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आगामी समीकरणांच्या दृष्टीने चर्चांचे तर्क लढवत असताना, भाजपने शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न सुरु केलेला दिसतो आहे. एनडीएमध्ये नाराजीचं वातावरण काही दिवसांपूर्वी चंद्राबाबूंच्या टीडीपीनेसुद्धा आगामी निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले होते. शिवाय, उद्धव ठाकरे आणि चंद्राबाबू नायडू यांची एनडीएतून बाहेर पडण्यावर फोनवरुन गुफ्तगू झाल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिले होते. मात्र नंतर टीडीपीच्याच नेत्यांनी पुढे येत या वृत्ताचे खंडन केले. काही दिवसांपूर्वीच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद प्रस्तावावेळी मोदींनी भाषण केले, त्यावेळी टीडीपीच्या खासदारांनी विरोधकांच्या गोंधळात आपला सूर मिसळवला होता. त्यामुळे एकंदरीत एनडीएमधील नाराजी गेल्या काही महिन्यांपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजपसाठी आगामी काळ कठीण असेल, यात शंका नाही. दरम्यान, आता भाजपने विधानसभेसाठी शिवसेनेसमोर 140 जागांचा प्रस्ताव ठेवल्यास, पुढे शिवसेनेची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Embed widget