एक्स्प्लोर

Maharashtra Political Crisis | भाजप सत्तेतून आऊट? मित्रपक्षांचं काय होणार?

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत परस्पर विरोधी विचारांची युती करुन अल्पकाळ टिकणारं सरकार स्थापन करण्यापेक्षा भाजपसोबत सरकार स्थापन करावं, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

मुंबई : भाजपने विरोधीपक्षात राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सत्तास्थापन करणार नाही, मात्र तरी मित्रपक्षांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत परस्पर विरोधी विचारांची युती करुन अल्पकाळ टिकणारं सरकार स्थापन करण्यापेक्षा भाजपसोबत सरकार स्थापन करावं, असं आवाहन रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सर्वच मित्रपक्ष शिवसेनेची मनधरणी करताना दिसत आहेत.  मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील, याची शक्यता फारच कमी आहे.

भाजपने साडेतीन वर्ष मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेने साडेतीन वर्षे उपमुख्यमंत्री पद घ्यावं. तर त्यांनतरची दीड वर्षे शिवसेनेने मुख्यमंत्री पद घ्यावं आणि भाजपने दीड वर्षे उपमुख्यमंत्री पद घेऊन, आपसातील वाद मिटवावा, असा सल्ला रामदास आठवलेंनी दिला.

VIDEO | महाशिवआघाडीचंच सरकार येणार, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार, सूत्रांची माहिती

मित्रपक्षांची उद्धव ठाकरेंना विनंती आहे की जनतेचा कौल महायुतीला आहे, महायुतीचंच सरकार यावं. आपल्या घरातलं काय करायचंय ते आपण बघुन घेऊ, दुसरीकडे जाण्याची गरज नाही. संजय राऊतांबद्दल आम्ही काही बोलत नाही, आम्ही उद्धव ठाकरेंशी बोलतो, असं महादेव जानकारांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत हीच आमची इच्छा आहे. दुसऱ्यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपल्या घरात काय करायचं, आपण बघुन घेऊ. येत्या दोन-तीन दिवसात सत्ता स्थापनेचा तिढा सुटेल अशी आशा आहे, असं महादेव जानकरांनी सांगितलं.

आम्ही विरोधात असलो तरी भाजप सोबतच असणार आहोत, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. भाजपने आम्हाला पदं दिली, आम्हाला योग्य मान-सन्मान दिला आहे. छोट्या पक्षाचे राजकीय अस्तित्व संपलं, हे म्हणणं चुकीचं आहे. आम्ही आमदार म्हणून काम करतचं राहणार आहोत, असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.

भाजपचे मित्रपक्ष असलेल्या रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती आणि इतर पक्षांच्या सर्व उमेदवारांनी भाजपच्याच चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवली होती.

एबीपी माझा लाईव्ह स्ट्रीमिंग

महत्त्वाच्या बातम्या

Harshwardhan Sapkal: राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमाआधीच पुण्यात मोठा राडा; हर्षवर्धन सपकाळ भडकले, म्हणाले, 'भाडोत्री गुंडांचा हा स्टंट; कार्यक्रम तर होणारच'
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू; जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती
बळीराजाचे डोळे आभाळाकडे! राज्यात कधी पडणार चांगला पाऊस, पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget