एक्स्प्लोर

'स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी मला बेवडा म्हणू नये'

'माफ करा, पण तुमचे खासदार बेवडे आहेत' अशा शब्दात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी सोलापुरात भाजप खासदार शरद बनसोडेंवर नाव न घेता निशाणा साधला.

सोलापूर : स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये, या शब्दात भाजप खासदार शरद बनसोडे यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे. स्थानिक रस्ते विकास कामाच्या भाषणात प्रणितींनी बनसोडे बेवडे असल्याचा उल्लेख केला होता. 'मुंबईत काय काय चालतं, ते उघड करावं लागेल. सुशिलकुमार शिंदे यांचे रेल्वेतले किस्सेसुद्धा आम्हाला माहित आहेत. स्लीव्हलेस घालून रेव्ह पार्टीत सापडलेल्यांनी माझ्यावर बोलू नये. शेवटची वॉर्निंग प्रणिती ताई, वैयक्तिक टीका केलीत, तर तुमच्याही वैयक्तिक आयुष्यातले किस्से बाहेर काढले जातील.' असं प्रत्युत्तर सोलापूरचे भाजप खासदार शरद बनसोडे यांनी दिलं. निवडणुकीचे वेध लागताच राजकीय टीकाही जोर धरु लागली आहे. 'माफ करा, पण तुमचे खासदार बेवडे आहेत' अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी शरद बनसोडेंवर नाव न घेता निशाणा साधला. सरकारच्या घरपोच दारु पोहचवण्याच्या निर्णयाच्या चर्चेवरही त्यांनी सडकून टीका केली. याच भाषणात त्यांच्या कचाट्यातून सहकारमंत्री सुभाष देशमुखही सुटले नाहीत. सुभाष देशमुखांच्या आरक्षित जागेवरील बंगल्यावरुन प्रणिती शिंदेंनी देशमुखांना लाज-शरम नसल्याचं वक्तव्य केलं. रस्ते विकास कामाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात प्रणिती शिंदे बोलत होत्या. काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? 'आत्ता तुम्ही पेपरमध्ये बघत असाल, यांचे दोन मंत्री, यांचं एकच काम आहे, एकमेकांशी भांडणं करा, त्यांचे गट सांभाळा, पेपरमध्ये आम्ही केलेल्या कामाची उद्घाटनं करा. म्हणजे आयत्या बिळात नागोबा. एवढंच यांचं काम आहे. हे स्वतः एक दमडी पण आणू शकले नाहीत सोलापूरमध्ये. किती? दोन मंत्री. एक बेवडा खासदार. माफ करा मला असे शब्द घ्यावे लागतात. पण आज महिला आहेत. पण दुसरं काय बोलणार? वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल. तुम्हाला माहित आहे का पेपरमध्ये काय आलं? इकडे महिला हैराण आहेत. मोदी सरकारने घोषणा केली आम्ही दारु घरपोच देणार. अरे बाबा, इकडे रेशन घरपोच मिळत नाहीये. इथे लोक मरत आहेत. तुम्ही जेवण घरपोच देत नाही, पण दारु देताय? म्हणजे काय चाललंय?'

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Devendra Fadnavis On Drought In Maharashtra: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार, राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत धडाधड निर्णय
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देणार, राज्यातील आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीसांचे कॅबिनेट बैठकीत धडाधड निर्णय
CJP And GEN Z Protest Maowadi Connection: CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?
CJP आणि जेन झीच्या आंदोलनावर माओवाद्यांची नजर असल्याचा संशय; धक्कादायक पत्र समोर, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Embed widget