एक्स्प्लोर

वाघ गुरगुरला म्हणून आम्ही त्याला सोडून देणार नाही, मुनगंटीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. राष्ट्रपती राजवटीबाबतचं वक्तव्य लोकशाहीविरोधी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

चंद्रपूर : वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर राज्यभरात विविध चर्चांना उधाण आले आहे. परंतु मी केवळ सविंधानातील तरतूद सांगितली असं स्पष्टीकरण मुनगंटीवार यांनी दिलं आहे. मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या विविध आरोपांचे खंडण केले. तसेच आम्ही शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करु, असा दावादेखील त्यांनी यावेळी केला आहे. वेळेत सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. राष्ट्रपती राजवटीबाबतचं वक्तव्य लोकशाहीविरोधी असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तसंच आता ईडीकडून चौकशीची नाही तर राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जात आहे, असा आरोपही केला होता. तर राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का, असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून विचारण्यात आला होता. याविषयी सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "राष्ट्रपती राजवटीबाबतचं विधान ही केवळ माहिती होती." "संविधानातील तरतूद सांगणं यात अडचण काय? त्याचा एवढा राग कशाला? असा प्रश्नही त्यांनी विचारला. शिवसेना-काँग्रेस एकत्र आली तरी सत्ता स्थापन होणार नाही : सुधीर मुनगंटीवार मुनगंटीवार म्हणाले की, गेली पाच वर्ष मी, युती टिकून रहावी, दोन्ही पक्षातील नेत्यांची मनं जुळून राहावी, यासाठी प्रयत्न करत आलो आहे. माझी भाषा ही तोडणारी कधीच नाही. माझी भाषा ही दोन्ही पक्षांचे संबंध चांगले रहावे, यासाठी आहे. कोणी गुरगुरायचं ठरवलं, तरी माझी हरकत नाही. मी वनमंत्री आहे. वाघांचं संवर्धन करणं आणि संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. वाघ गुरगुरतो म्हणून आपण वाघाला सोडून देत नाही. वाघाला सोबतचं घ्यायचं असतं, असे बोलून मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला आहे. पाहा काय म्हणाले मुनगंटीवार? राष्ट्रपती राजवटीची भाषा करणं हा जनादेशाचा अपमान : संजय राऊत
शिवसेना-भाजपचं गोत्र सारखं शिवसेनेची मनधरणी करण्याचा भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या फोनला मातोश्रीवरुन प्रतिसाद मिळाल्याने भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचं कळतं. याबद्दल सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "शिवसेनेच्या सहकारी मंत्र्यांसोबत माझी वैयक्तिक बातचीत होते. चर्चेतून, संवादातून प्रश्न मार्गी लागेल. शिवसेना आणि भाजपचं गोत्र सारखं आहे, स्वभाव सारखा आहे, त्यामुळे युती झाली आहे. शिवसेनेसोबतच सत्ता स्थापन करण्याचं आमच्या मनात आहे. जनादेशाचा सन्मान केला पाहिजे."
काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा; हुसेन दलवाई यांचं सोनिया गांधींना पत्र 'सामना'तील टीकेचं उत्तर टीकने दिलं नाही! स'सामना'मध्ये आमच्याबद्दल अतिशय वाईट भाषेत अग्रलेख लिहिले, पण आम्हीही राग मानायचं का? पण तो विचार केला नाही. राग मनात ठेवला असता तर कधीच युती झाली नसती. सामनातून केलेल्या टीकेचं कधीच टीकेने दिलं नाही. प्रेमाने सगळं जिंकता येतं, असं उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी 'सामना'तील टीकेवर दिलं. महायुतीला सरकार स्थापन करावंच लागेल : सुधीर मुनगंटीवार

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget