एक्स्प्लोर

धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे अन् प्रीतम मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

जातीनिहाय जनगणना हवी, त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल आणि समाजाला न्याय देण्यास मदत होईल, असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

औरंगाबाद : जातीनिहाय जनगणना हवी अशी आमची मागणी असल्याचं मत औरंगाबादमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. गोपिनाथ मुंडे यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जातीनिहाय जनगणनेची मागणी होती. यासंदर्भात त्यांनी संसदेत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केले होते. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या जनगणना जवळ आली असून ती जातीनिहाय व्हावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच या जनगणनेमुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी, राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच."

पाहा व्हिडीओ : धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, "ओबीसा जनगणना झाली पाहिजे, ही मागणी मुंडे साहेबांनी वेळोवेळी संसदेत मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात संसदेत आवाज उठवला आहे. अशातच आता जनगणना होणार आहे, त्यामुळे जनगणना होत असताना यासंदर्भात सकारात्मक पावलं उचलली गेली पाहिजे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल. त्यामुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल."

"ओबीसी जनगणना व्हावी ही आमची मागणी आहे. यासंदर्भात काल मी ट्वीट हिंदीत केलं होतं. त्याचा वेगळा अर्थ काही नाही. राष्ट्रीय स्तरावर काम करते म्हणून हिंदीत ट्वीट केलं, इतकाच अर्थ आहे. तसेच काल मोर्चात ओबीसी मुख्यमंत्री व्हावा असे बॅनर होते, त्याचा माझ्याशी संबंध जोडू नका.", असंही पंकजा मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.

शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "शेतकरी मोर्चे निघात आहेत, मात्र यासंदर्भात सरकारची चर्चेची तयारी आहे. तरीसुद्धा मोर्चे सुरुच आहेत. सरकार सकारात्मक आहे. आता यात राजकारण आहे की, अजून काय याचाही विचार केला पाहिजे."

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget