एक्स्प्लोर

मला अटक करण्याची तयारी सुरु आहे, भाजप नेत्याचा दावा 

Mohit Kamboj : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.

Mohit Kamboj : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे. नवाब मलिक यांना सात मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण अधिकच तापलेय. आता भाजप नेत्याने मला अटक करण्याची तयारी सुरु असल्याचे ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे. 

भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत अटक करण्यात येणार असल्याचा दावा केला आहे. 'बहुतेक मला अटक करण्याची तयारी सुरु आहे... जय शिवाजी जय भवानी' असे ट्वीट मोहित कंबोज यांनी केले आहे. मोहित कंबोज यांच्या ट्वीटनंतर सोशल मीडियात सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आणि विरोधकांचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. 

नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kambhoj) यांनी जल्लोष करत म्यानातून तलवार काढली होती. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आता त्यांना अटक करण्याची तयारी सुरू असल्याचं स्वत: कंबोज यांनी सांगितले आहे.

मोहित कंबोज यांचे ट्विट - 

मलिकांच्या अटकेनंतर तलवार नाचवणं भाजप नेत्याला पडलं महागात! 
मलिकांच्या अटकेनंतर काल मोहित कंबोज यांच्याकडून जल्लोष साजरा करण्यात आला होता. मोहित कंबोज यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. कंबोज यांनी तलवारही नाचवली होती. याप्रकरणी कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तसंच लोकांची गर्दी जमवत कोविड (covid) नियमांचं उल्लंघन केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार नाचवत आणि फटाके फोडत जल्लोष केला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget