एक्स्प्लोर

पालघरमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकला बांधून नेला; भाजपकडून सरकारवर हल्लाबोल

दवाखान्याची रुग्णवाहिका न मिळाल्याने 35 ते 40 किमी अंतरावर बाईकवरून मुलाचा मृत्यदेह न्यावा लागल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली होती. या प्रकरणावरुन भाजपने राज्य सरकारव निशाणा साधलाय.

Palghar Latest News : एका मृत्यू पावलेल्या चिमुकल्याला दवाखान्याची रुग्णवाहिका न मिळाल्याने 35 ते 40 किमी अंतरावर कडाक्याच्या थंडीत  बाईकवरून मृत्यदेह न्यावा लागल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणावरुन भाजपने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही घटना अतिशय लज्जास्पद आहे. विशिष्ट कंपन्यांना मदतीसाठी सुपर मार्केटमधून दारु विक्री करण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारने प्राथमिक सुविधांकडे लक्ष द्यावे. पालघर जिल्ह्यात गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला काय घडले पहा. रुग्णवाहिका नसल्याने दुर्दैवी पित्याला 6 वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकला बांधून न्यावा लागला, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. 

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका चिमुकल्याचा तापानं मृत्यू होतो, नि पैसे नाहीत तर मृतदेह पायी घेऊन जा असं सांगत हॉस्पिटलकडून ॲम्ब्युलन्स नाकारली जाते. ही निर्दयता दाखवलीय शासकीय जव्हार कुटीर रुग्णालयानं. या प्रकरणात 2 ॲम्ब्युलन्स चालकांचं निलंबन झालंय पण हॉस्पिटलवरही कारवाई करा तरच अशी दांभिकता थांबेल असे चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

पालघरमध्ये 6 वर्षांच्या मुलाचा मृतदेह बाईकला बांधून नेला; भाजपकडून सरकारवर हल्लाबोल

नेमकं प्रकरण काय

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला एका मृत्यू पावलेल्या चिमुकल्याला दवाखान्याची रुग्णवाहिका न मिळाल्याने 35 ते 40 किमी अंतरावर कडाक्याच्या थंडीत कुडकुडत बाईकवरून मृत्यदेह न्यावा लागल्याची घटना घडली. ही दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे घडली आहे. पायरवाडी येथे पहिलीत शिकणारा अजय युवराज पारधी  वय 6 वर्ष  ह्याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर आई-वडिलांनी उपचारासाठी त्रिंबकेश्वर येथील दवाखान्यात चिमुकल्याला दाखल केलं. परंतु तेथे एक दिवसाच्या उपचारानंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर त्यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णलयात घेऊन गेले. परंतु तेथील डॉ जव्हार कुटीर रुग्णालयात दाखल करा, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच जव्हार कुटीर रुग्णलयात मुलाला उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारादरम्यान 25 तारखेला रात्री 9:00 वाजता कुटीर रुग्णालयात चिमुकल्याचा मृत्यू झाला. 

परंतु आर्थिक चनचनीत अडकलेल्या या कुटूंबाला मृत्युदेह आता घरी न्यायचा कसा? असा प्रश्न उभा ठाकला? यावेळी त्यांनी रुग्णवाहीकेसाठी विचारणा केली असता पैस देणार असाल तरच गाडी मिळेल. अशी तंबीच रुग्ण चालकांनी कुटूंबियांना दिली, असल्याचे मृत्यू झालेल्या अजयचे वडील युवराज पारधी यांनी सांगितले. तसेच पैसे नसतील तर पायीपायी मृत्युदेह घेऊन जा, असेही त्यांना यावेळी सांगण्यात आले. परंतु पैसे द्यायला नसल्याने हताश होऊन थंडीत  कुडकुडत  35 ते 40 किमी अंतरावर बाईकवर  मृतदेह घेऊन गावी पायरवाडीत येथे आले. ही दुर्दैवी घटना प्रशासनाच्या कारभारावर चीड आणणारी असून, या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Devendra Fadnavis on Nashik potholes: 'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
'असं रिलॅक्स राहून चालणार नाही, महाकुंभ तोंडावर'; नाशिकमधील खड्ड्यांवरुन देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
Embed widget