Sangli : मुख्यमंत्रिपदासाठी दगाबाजी करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मिळाली आहे. देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील (Maharashtra government) सरकार शंभर टक्के बरखास्त होईल, त्यानंतर पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त होईल, असेही भाकीत भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. ते सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.


केंद्रातील भाजप सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm narendra modi) यांच्या नेतृत्वाखाली आठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांगली भाजपच्या वतीने जिल्हा कार्यकर्त्यांचा मेळावा सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. भाजप प्रदेश उपाध्यक्ष व इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याला सांगलीचे खासदार संजय काका पाटील, आमदार सुरेश गाडगीळ,मिरजेचे आमदार सुरेश खाडे,भाजपा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते,नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील सरकार शंभर टक्के बरखास्त करतील


यावेळी बोलताना हळवणकर म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी दगाबाज करून महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पहिली शिक्षा राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांनी दिली आहे. राष्ट्रपतीपदाचा निवडणुकीनंतर (Presidential Election 2022) महाराष्ट्रातील सरकार शंभर टक्के बरखास्त होईल,त्यानंतर पश्चिम बंगालमधील ही सरकार बरखास्त होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकच सरकार बरखास्त केले आहे. मात्र आता महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील सरकार शंभर टक्के बरखास्त करतील,असा दावाही हळवणकर यांनी केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या