School Bus Fare : आधीच वाढलेल्या महागाईचा सामना करणाऱ्या पालकांना दरवाढीचा आणखी एक झटका बसणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बस चालकांनी स्कूल बसच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल बसच्या दरात 20 टक्क्यांनी दरवाढ करण्यात आली आहे. 


इंधन दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. त्याचा फटकाही स्कूल बस चालकांना बसला आहे. कोरोना महासाथीच्या काळात दोन वर्ष स्कूल बस या वाहतुकीशिवाय उभ्या होत्या. या दरम्यानचा देखभाल खर्चदेखील मोठा होता. स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यातच आम्ही स्कूल बसच्या शुल्कात 30 टक्क्यांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेणार होतो. मात्र, पालकांची अडचण होऊ नये यासाठी ही दरवाढ 20 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.


स्कूल बस ओनर्स असोसिएशनशी संबंधित असलेल्या स्कूल बस चालकांकडून 1800 रुपये प्रति विद्यार्थी शुल्क आकारले जाते. साधारणपणे मोठ्या बसमध्ये 40 विद्यार्थ्यांची आसन क्षमता असते. स्कूल बससाठी शासनाचे कठोर नियम असतात. त्यांची अंमलबजावणी करावी लागते. मात्र, मागील  काही वर्षांपासून अनधिकृतपणे स्कूल व्हॅन, रिक्षा, बसचा वापर करून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात आहे. त्यांच्याकडून 1500 ते 2000 रुपये शुल्क वसूल केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत असल्याचा मुद्दा गर्ग यांनी उपस्थित केला. 


वाढत्या महागाईच्या झळा शिक्षण क्षेत्रालाही जाणवत आहेत. विद्यार्थ्यांचा गणवेश, शालेय पुस्तके, वही व इतर खर्चात महागाईमुळे मोठी वाढ झाली आहे. 


दरम्यान, राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले. आदेशात शैक्षणिक सत्र 2022 - 23 सुरू करण्यासाठी निर्देश देण्यात आलेत.  शिक्षण आयुक्तांच्या निर्देशानुसार, राज्यातील शाळा आणि शैक्षणिक सत्र 13 जून पासून सुरू होणार आहे. तर विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू होणार असल्याचं या निर्देशात म्हटलं आहे. राज्यातील विद्यार्थ्यांनी 15 जूनपासून तर विदर्भातील विद्यार्थ्यांनी 27 जूनपासून प्रत्यक्षात शाळेत हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


इतर महत्त्वाची बातमी:


Maharashtra School Start Date : आजपासून विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा सुरु; विदर्भात मात्र शाळा 27 जूनपासून सुरू


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI