कोल्हापूर : देशाला बदनाम करण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. या सगळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला, ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, एखादी तपास यंत्रणा काम करते, तेव्हा त्याला कोर्ट जामीन देत नाही. मात्र त्यावर एखादा मंत्री केंद्राच्या तपास यंत्रणेवर टीका करत सुटले आहेत. त्याच पद्धतीने अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक शाहरुख खानच्या मुलाच्या मागे वकीला प्रमाणे उभा राहिलेत. जर तपास यंत्रणा आणि ईडी बद्दल शंका असेल तर विरोधकांनी कोर्टात जावं...100 कोटी लसीवरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या टिकेवर विचारले असता, देशाला बदनाम करण्यासाठीचे काम काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना करत आहे. या सगळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आघाडीवर आहेत. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.



पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून बोलताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे वय झाले आहे. तरीसुद्धा पिंपरी-चिंचवड मध्ये जाऊन नगरसेवकांना भेटत आहेत. याचा अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार एकटे पुरेसे ठरत नाहीत. असा टोला पाटील यांनी लगावला.


सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलचे डिझेलचे दर परवडत नाही. त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. त्याचे दर वाढण्याचे कारणीभूत राज्य सरकारच आहे. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या त्यात गोंधळ झाला त्यावर आम्ही आवाज उठवला तर राजकारण केले जाते असा आरोप महाविकासआघाडी कडून होतो. एसटीची दरवाढ करून नागरिकांचे कंबरडे मोडण्याचा काम हे राज्य सरकार करत आहे. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.


Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर, एनसीबी महासंचालकांकडून चौकशीचे आदेश