Sameer Wankhede: आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान याच्याकडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. यापैकी 8 कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede)  यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी केला. प्रभाकर साईल यांच्या आरोपानंतर एकच खळबळ माजली. यातच समीर वानखेडे यांच्या अडचणीत भर घालणारी माहिती समोर आली. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांची दक्षता समिती नेमण्यात आली. समीर वानखेडे यांची चौकशी करणारी समिती उद्या मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. याचपार्श्वभूमीवर समीर वानखेडे दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. 


दरम्यान, पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्याविरोधात केलेल्या आरोपाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती, त्या क्रूझबाहेर आपण हजर असल्याचा दावा स्वत: प्रभाकर साईल यांनी केला. दरम्यान, आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर त्याचे वडील शाहरूख खानकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली होती. यातील 8 कोटी समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असाही त्यांनी आरोप केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे आणि प्रभाकर साईल यांची अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, समीर वानखेडे यांची खात्यांअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. 


दरम्यान, आर्यन खान प्रकरणात तपासात अडथळे निर्माण करण्याच्या प्रयत्नांना प्रतिबंध करावा या मागणीसाठी संचालक समीर वानखेडेंनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. “माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी कधीही चुकीचा वागलेलो नाही. माझ्यावरील सर्व आरोप निराधार असून मी कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार आहे. तसेच मुंबई पोलीस मला फसवण्यासाठी माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करू शकते. जर मुंबई पोलीस अशाप्रकारचे पाऊल उचलते, तर माझ्याविरोधात कोणतीही कारवाई होऊ नये, असेही समीर वानखेडे यांनी म्हटले होते. याच याचिकेवर सोमवारी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यासंदर्भात कोणताही आदेश देण्यास सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नकार दिला. दरम्यान, समीर वानखेडे यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू झाली. मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे मुंबईहून दिल्लीला रवाना झाले आहेत.


संबंधित बातम्या-