एक्स्प्लोर

शरद पवार यांचीच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू आहे का? : चंद्रकांत पाटील 

शरद पवार हेच सर्व आंदोलक संघटनांशी आता बोलत असतात, त्यामुळे शरद पवार यांचीच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू आहे का असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर : शरद पवार यांचीच पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू आहे का, असं दिसत असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. कारण, शरद पवार हेच सर्व आंदोलक संघटनांशी बोलत असतात, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत जे घडलं ते सगळ्यांनी पाहिलंच आहे. नरेंद्र मोदी यांचा घातपात करण्याचा डाव होता हे एका वहिनीच्या स्टिंगवरून समोर आले असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यामुळे काँग्रेसने आता तरी मान्य करावे की, पंजाब सरकारने योग्य ती सुरक्षा पुरवली नाही ते. काँग्रेस आणि इतर पक्षांनी या घटनेची खिल्ली उडवली असल्याचे देखील पाटील म्हणाले. सुरक्षा म्हणून संबधित लोकांना बाजूला करणे गरजेचे होते, पण असे काहीच घडले नाही. जिथे ही घटना घडली तिथे शेतकऱ्यांबरोबर खलिस्तानी देखील होते असे पाटील म्हणाले.

ज्या रूटवरून पंतप्रधान जाणार त्या रूटवर काहीतरी गडबड होणार असल्याचे अधिकाऱ्यांच्या संभाषणामधून समोर आले असल्याचे पाटील म्हणाले. जिथे ही घटना घडली तिथे शेतकऱ्यांबरोबर खलिस्तानी देखील होते. पाकिस्तनाची सीमा केवळ 13 किलोमीटर अंतराव होती. पंतप्रधान जाणार त्या मार्गावरील सर्व दुकाने बंद करायची असतात. पण असे काहीच केले नव्हते असे पाटील यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि इतर पक्षांनी या घटनेची खिल्ली उडवली. प्रियांका गांधी यांना सर्व रिपोर्ट करत होते, म्हणजे हे सर्व प्री प्लॅन होता का? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, या घटनेविरोधात भाजप रस्त्यावर उतरून निषेध करणार असल्याचे पाटील म्हणाले.  ज्या ठिकाणी भाजप सरकार नाही त्याठिकाणी केंद्राबरोबर संघर्ष केला जात आहे. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका केली. शरद पवार यांनी स्वतःच्या जीवावर महाराष्ट्रात सरकार आणलं नाही तरी धरून आणलेले का असेना  पण गोव्यात एक गुजरातमध्ये एखादा आमदार असतो असा खोचक टोला पाटील यांनी लगावला. कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीनी भाजपच्या चिन्हावर लढावे. त्यांनी भाजप पूर्ण सहकार्य करेल असे पाटील यावेळी म्हणाले. 

कोरोनाच्या नियमावलीवरुन देखील पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. कोरोनाबाबत जे नियम लावलेत त्याचा कशाचा कशाला काही संबध नाही. याबाबत सगळ्यांनी बसून किमान एक वाक्यता आणली पाहिजे असे यावेळी पाटील म्हणाले. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांनाही टोला लगावला. हसन मुश्रीफ यांना कागल सोडून बाकी काही माहीत नसते असे पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget