एक्स्प्लोर
औरंगाबादेत भाजप पदाधिकाऱ्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला

औरंगाबाद : औरंगाबादेत भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीच्या शहराध्यक्षानं एका तरुणावर तलवारीनं प्राणघातक हल्ला केला आहे. भर दुपारी पाठलाग करुन हा हल्ला करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. औरंगाबादच्या त्रिमूर्ती चौक परिसरात भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीच्या शहराध्यक्ष शेख हाफिज याने आपल्या सहकाऱ्यांसोबत पाठलाग करून एका तरुणावर तलवारीने वार केला. या प्राणघातक हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. संदीप दत्तात्रय डहाळे हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो विमा कंपनीत काम करतो . हाफिजच्या नातेवाईकासोबत संदीपचा दुचाकी बाजूला घेण्यावरून वाद झाला. याचं कारणावरून संदीप उत्तमनगर येथील चौकात उभा असताना शेख हाफिज हा ३० ते ४० जणांसह तेथे आला. संदीपला पाहताच त्याने तलवार काढून त्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र जीव वाचवण्यासाठी संदीपने तिथून पळ काढला. पळून जाणाऱ्या संदीपच्या पाठीवर त्याने तलवारीने वार केला. जखमी अवस्थेत संदीपने तेथील अजिंक्य ज्वेलर्समध्ये धाव घेतली. अजिंक्य ज्वेलर्सच्या सीसीटीव्हीमध्ये हा सारा प्रकार कैद झाला आहे. याप्रकरणी शेख हाफिज विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जवाहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















