एक्स्प्लोर

राजकीय फायद्यासाठी भाजपने आयारामांना दिलेल्या शब्दाची पूर्तता केली?

निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमधील काही साखर सम्राटांना काही आश्वासनं देऊन भाजपमध्ये घेतले. पक्षप्रवेशावेळी भाजपने दिलेल्या आश्वासनांची आता पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे.

सोलापूर : निवडणुकीत पक्षाची ताकद वाढवण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस राष्ट्रवादीमधील काही साखर सम्राटांना काही आश्वासनं देऊन भाजपमध्ये घेतले. पक्षप्रवेशावेळी भाजपने दिलेल्या आश्वासनांची आता पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. पंढरपूरमधील कल्याणराव काळे, कोल्हापूरमधील धनंजय महाडिक आणि वारणा कारखान्याच्या विनय कोरे यांना त्याचा फायदा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पंढरपूरमधील काँग्रेसचे साखर सम्राट कल्याणराव काळे यांना भाजपात प्रवेश देत माढा आणि सोलापूर लोकसभा जागा जिंकण्यात त्यांचा वापर करून घेतला होता. कल्याणराव काळे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे, मात्र गेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, परंतु ऐनवेळी तिकीट कापले गेल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवत तब्बल 70 हजार मतं मिळविली होती. या लोकसभा निवडणुकीपूर्वी काळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला. लोकसभा विजयानंतरदेखील त्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न होऊ शकल्याने कल्याणराव काळे समर्थकांत अस्वस्थता पसरली होती. अडचणीत आलेल्या साखर कारखान्याला लागणारी आर्थिक मदत करावी, अशी काळे यांची मागणी होती. आता आचारसंहितेपूर्वी राष्ट्रीय सहकार विकास निगमाकडून कल्याणराव काळे यांच्या सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्यास 75 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. कल्याणराव काळे यांच्याकडे असलेली सहकाराची ताकद आणि मोठा कार्यकर्ता संच यामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकीत काळे यांचा फायदा झाला. तसेच पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि माढा हे मतदारसंघ जिंकण्यासाठी त्यांची मदत होणार आहे. कल्याणराव काळे यांच्यामुळे पंढरपूर, सांगोला आणि माढ्याचा विजय भाजपाला दिसू लागला आहे. त्यामुळे काळे यांना दिलेला शब्द पूर्ण करत मुख्यमंत्र्यांनी मोठे गणित घातले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आणि 15 दिवसात त्यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्यास 85 कोटींची मदत मिळाली आहे. महाडिक यांचा भीमा सहकारी साखर कारखाना मोहोळ तालुक्यात असून त्यांचा भीमा परिवारदेखील भाजपाला मोहोळ विधानसभा जिंकण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या खेळीने काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा भाजपच्या ताब्यात येणार असून विधानसभा निवडणुकीपूर्वी साखर सम्राटांना खुश करत केलेली शब्दपूर्ती भलतीच फायदेशीर ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Drought: राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय
राज्यात आणखी 36 तालुके दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट होणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती; ग्राउंड ट्रूथिंगबद्दलही मोठा निर्णय

व्हिडीओ

Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
महायुतीत पुण्यातून भाजपच फायनल, शिक्षक मतदारसंघातून माघार; शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची पहिली प्रतिक्रिया
Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
एमपीएससी आंदोलनात उपोषण सोडताच पुणे पोलिसांकडून ऋषिकेश गांगुर्डे, सोमनाथ चव्हाण, गजानन शेळकेसह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल; रोहित पवार अन् विवेकानंद पाटीलचं काय झालं?
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Embed widget