एक्स्प्लोर

ज्यांच्या आलमारीत सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणायचा नसतो : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : ज्यांच्या आलमरीत सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणायचा नसतो. ते सांगाडे बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलेय. ज्यांच्या आलमारीत सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणायचा नसतो, असा टोला चंद्रपूर येथील सभेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.  देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल मैदान, चंद्रपूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि इतरही नेते उपस्थित होते. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. अडीच वर्ष तुम्ही 100 कोटींची वसुली करणारे, फेसबुकवर असलेले, घरी बसलेले सरकार पाहिले, आता खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आले आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल मी पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीला परिवारवादी म्हटले तर उद्धव ठाकरे यांना मिरची झोंबली. पण उद्धवजी, 'तुमको मिर्ची लगी तो क्या करू?' मी काचेच्या घरात राहत नाही, तुम्ही राहता, त्यामुळे माझ्या नादी लागू नका. ज्यांच्या आलमरीत सांगाडे पडले आहेत, त्यांनी सावकारीचा आव आणायचा नसतो. ते सांगाडे बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. मी कधी कुणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडलो तर सोडत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक उपलब्धी आहेत. पण सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आणले, ही सुद्धा एक उपलब्धीच म्हणावी लागेल. या सर्व परिवारवादी पक्षांना चिंता कुटुंबाची. आणि ज्यांचा परिवार संपूर्ण देश आहे, ते आहेत नरेंद्र मोदी. बरे या या बैठकीत ठराव काय झाला तर राहुल गांधी यांची दाढी करा आणि त्यांचे लग्न करा, अशी टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले, त्या अमेरिकेतील त्यांचे भव्य स्वागत संपूर्ण जगाने पाहिले आणि दुसरीकडे राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत कसा वाईट, यावर व्याख्याने देतात. त्यांनी भारतात लोकशाही नाही, असे सांगितले आणि त्यावर अमेरिकेनेच खुलासा करून सांगितले की भारतात लोकशाही आहे आणि ती समृद्ध सुद्धा होते आहे. खरे तर काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, आजचाच दिवस आहे, ज्यादिवशी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली होती, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
मुंबईकरांनो सावधान! अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
कर्जमाफी लांबणीवर! 5 जुलैची डेडलाईन हुकणार, सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती, कृषीमंत्र्यांचा मोठं वक्तव्य  
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 जुलै 2026 | शनिवार
Maharashtra Rain : राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
राज्यभर पावसाचं धुमशान! मुंबई-ठाण्यासह कोकणात जलमय स्थिती, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

व्हिडीओ

Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती  
एकनाथ शिंदे यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला, कुटुंब आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक दिवस आराम करणार असल्याची माहिती
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
10 वर्षात कोणत्या FMCG स्टॉक्सनं सर्वाधिक परतावा दिला? पतंजली फूड्स, रेडिको खेतान आणि टाटा कंझ्युमर आघाडीवर
Sachin Ahir : वरळी कोणाचा सातबारा नाही, 2029 ला महायुतीची जागा निवडून आणणार, सचिन अहिर नेमकं काय म्हणाले?
2029 ला वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार का? विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर काय म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi : सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण, 2 षटकार मारले, वैभव सूर्यवंशीनं पहिल्या डावात किती धावा केल्या?
Telegram : टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली, कारवाईसाठी 15 दिवसांची मुदत, नेमकं काय घडलं?
टेलीग्रामच्या अडचणीत आणखी वाढ, केंद्र सरकारनं आणखी एक नोटीस पाठवली,15 दिवसांचा वेळ दिला, नेमकं काय घडलं?
EPFO: कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज,पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज जमा करा, ईपीएफओकडून आदेश जारी
Devendra Fadnavis on Missing Link Potholes: नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
नव्याकोऱ्या मिसिंग लिंकवर खड्डे कसे पडले, देवेंद्र फडणवीसांनी उलगडून सांगितलं इंजिनिअरिंग टेक्निक, म्हणाले, 'पहिल्या पावसानंतर दुसरी लेयर येते'
Ketan Agrawal Case : केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
केतन, सिया अन् चेतनांतर आता लोहगड प्रकरणात 'चौथ्याची' एन्ट्री; कोण आहे तो मिस्ट्री मॅन? काय आहे त्याचा रोल?
Embed widget