एक्स्प्लोर

सोलापुरात भाजपची राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी!

सोलापूर : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतात तर दुसरीकडे राज्यातले त्यांचेच सहकारी मंत्री राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतात. त्यामुळे भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत का? असा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने सोलापुरात भाजप-राष्ट्रवादी अशी अभद्र युती उदयाला आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजप-राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून लढवत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीची युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही. भाजप-राष्ट्रवादीच्या राज्यातल्या नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असली तरी सोलापुरात मात्र दोन्ही पक्षाचे झेंडे मोठ्या दिमाखात फडकत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषदा आणि चार पंचायत समितीच्या जागांवर भाजप-राष्ट्रवादी मिळून लढणार आहे. राज्यात एकमेकांच्या अंगावर जाहीरपणे चिखलफेक करणारे दोन्ही पक्ष हातात हात घालून निवडणूक लढवणार आहेत. वैचारिक बैठक वेगळी असली तरी निवडणुका जिंकण्यासाठी ही युती केल्याचा दावा भाजप नेते करतायत. मोठ्या थाटामाटात या अभद्र युतीच्या प्रचाराचा सोहळा पार पडला. भाजप-राष्ट्रवादीच्या या युतीचं दस्तुरखुद्द सोलापूरच्या खासदारांनाही कौतुक वाटलं. त्याची कबुलीही त्यांनी जाहीरपणे दिली. या युतीचे शिल्पकार आहेत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख. देशमुखांनी अस्तित्वात आणलेल्या या अभद्र युतीचा प्रचारही तेवढ्याच थाटात सुरु झालाय. एकीकडे मुख्यमंत्री राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रवादीला भ्रष्ट आणि कन्फ्युजड पक्ष असल्याची टिका फडणवीस करत असताना सहकार मंत्र्यांनी मात्र राष्ट्रवादीशी मैत्री केलीय. राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही म्हणतात ते यालाच. ही अशक्य वाटणारी युती केवळ स्थानिकांच्या मार्जीवरून अस्तित्वात आलेली नाहीय. वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीनेच युती केल्याचा दावा उभय बाजूने केला जातोय. शरद पवारांचं मध्यावधीच भाकीत खर ठरलंच तर राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर राज्य सरकार चालण्याची ही नांदी तर नसेल?

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Beed Crime: उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला, अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला हजेरी लावून घरी गेला अन् तब्ब्ल 45 लाखांची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात अडकला; नांदेडच्या MPSC टॉपर अन् क्लास 1 अधिकाऱ्याला अटक
Vasai Crime : कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
कोट्यवधी रूपये लाटण्याचा टाकला मोठा डाव, कंपनीच्या अध्यक्षानेच एमडींचा काटा काढण्याचा प्लॅन रचला अन्..., वसईतील धक्कादायक घटना
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget