एक्स्प्लोर

Bhandara Hospital Fire : 'मुख्यमंत्री येऊनही दोषींवर कारवाई नाही', भाजपकडून उद्या भंडारा बंदची हाक

Bhandara Hospital Fire : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भंडाऱ्यात येऊन पाहणी केली मात्र तरीही दोषींवर कारवाई न झाल्यानं भाजपकडून उद्या, सोमवारी भंडारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारीच्या मध्यरात्री अतिदक्षता विभागात आग लागून 10 निष्पाप चिमुकल्यांचा बळी गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी भंडाऱ्यात येऊन पाहणी केली मात्र तरीही दोषींवर कारवाई न झाल्यानं भाजपकडून उद्या, सोमवारी भंडारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. भंडारा-गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री येऊन गेले व आज राज्याचे मुख्यमंत्री भंडारा जिल्ह्यात येऊन सुद्धा दोषींवर कारवाई झाली नसल्याने जिल्हा भाजपाच्या वतीने उद्या भंडारा बंद ठेवण्यात येणार आहे. हे प्रकरण लवकरात लवकर तपास करुन दोषी अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी खासदार मेंढे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, म्हणाले दोषींवर कडक कारवाई केली जाईल भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीची सखोल चौकशी करण्यात येईल, कुठलीही कसर ठेवण्यात येणार नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडारा येथे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाची देखील पाहणी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, हे दुःख न भरून निघणारे आहे, मी सांत्वन करायला आलो आहे. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती बनविली आहे, यात मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुखही असणार आहे. या समितीत सहा सदस्य राहतील, महिन्याभरात त्याचा अहवाल येईल, त्यानंतर आम्ही आवश्यक कारवाई करु, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, दुर्घटना घडली त्याबद्दल कोणतेही शब्द माझ्याकडे नाहीत. हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, घटनास्थळ पाहिले पीडित कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन केले. काही उपकरणांबद्दल, यंत्रणेबद्दल काही मागण्या आल्या होत्या का हे पाहावे लागेल. कोरोना संदर्भात काम करताना आरोग्य यंत्रानेबद्दल काही दुर्लक्ष झाले आहे का हे अहवालात समोर येईल, असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या सर्व रुग्णालयाच्या फायर एन्ड सेफ्टी ऑडिटचे आदेश दिले आहे, जरी ऑडिट झाले असले तरी पुन्हा करायला लावू, असंही ते म्हणाले. या घटनेवरुन थेट राज्याच्या आरोग्याच्या स्थितीवर जाऊ नका आम्ही राज्याची जबाबदारी घेतली आहे, असंही ते म्हणाले.

Bhandara Hospital Fire | राष्ट्रपती, पंतप्रधानही हळहळले; मुख्यमंत्र्यांकडून घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश

महत्त्वाच्या बातम्या

प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
प्रकरण न्यायप्रविष्ठ, ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, बंडखोरी केलेल्या सहा खासदारांच्या दिल्लीतील घराबाहेर लावला व्हीप
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
भाजपनं आपल्याच पक्षातील खंडोजी खोपडेला हाताशी धरलंय, रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडं? म्हणाले,  डिलिमिटेशनच्या माध्यमातून भाजपला संविधान बदलायचंय
भाजपनं आपल्याच पक्षातील खंडोजी खोपडेला हाताशी धरलंय, रोहित पवारांचा रोख नेमका कुणाकडं? म्हणाले,  डिलिमिटेशनच्या माध्यमातून भाजपला संविधान बदलायचंय
15 डिसेंबरनंतर शरद पवार सत्तेत सहभागी होणार, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणावरही महत्वाचं भाष्य 
15 डिसेंबरनंतर शरद पवार सत्तेत सहभागी होणार, बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य, विलिनीकरणावरही महत्वाचं भाष्य 

व्हिडीओ

Majha Katta Sanjay Mone Ashok Mulye : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, अभिनेता संजय मोने माझा कट्ट्यावर
Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Live सामन्यात भयंकर राडा, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला, मैदानावर वाद कशामुळं?
Live सामन्यात भयंकर वाद, इंग्लंडचा जेमी ओव्हरटन ऑस्ट्रेलियाच्या मिशेल मार्शला भिडला
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
ह्रदयद्रावक दुर्घटना... ठाण्यात दुचाकीवरील तरुणी ठार, धुळ्यात वीजेच्या धक्क्याने 14 वर्षीय युवकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्यात तत्कालीन शिक्षण उपसंचालकास अटक; 6 दिवसांची पोलीस कोठडी
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
राहुल गांधींची गळाभेट, नेत्यांचे स्वागत, पण भूमिका ठाम; डिलिमिटेशन विधेयकास DMK चा पाठिंबा, भेटीनंतर स्टॅलिन म्हणाले...
Gold Silver Rate : सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर 
सोने उच्चांकावरुन 68 हजार रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात देखील 2.67 लाख रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर
Rohit Pawar : डिलिमिटेशनला विरोध असल्याचं आजच स्पष्ट करा, रोहित पवारांंचं सुप्रिया सुळेंना पत्र, धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर
रोहित पवारांच्या पत्रावर धैर्यशील मोहिते पाटील आणि बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन्ही खासदार म्हणाले...
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
मलाही जाता आले नसते का? पवार साहेबांनींही देशहिताचा विचार करावा, उद्धव ठाकरेंचं आवाहन, म्हणाले, 850 खासदार केले तर खर्च किती वाढणार? कोणाला झेपणार?
Delimitation : इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? राहुल गांधी आणि स्टॅलिन यांच्या गळाभेटीचा फोटो समोर
इंडिया आघाडीचे नेते आणि स्टॅलिन यांच्यात बैठक सुरु, द्रमुक निर्णयाचा फेरविचार करणार? देशाचं लक्ष चेन्नईकडे लागलं
Embed widget