एक्स्प्लोर
Advertisement
माजी नगरसेवकाप्रमाणे भावाचीही हत्या, पाच जण अटकेत
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील माजी नगरसेवकाच्या धाकट्या भावाच्या हत्येप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी तुमसरच्या मुख्य बाजारपेठेत माजी नगरसेवक प्रशांत उके यांच्या धाकटा भाऊ हेमंत उकेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
गेल्याच वर्षी तुमसर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक प्रशांत उके यांचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या दोन्ही हत्या पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी नागपुरातून पाच जणांना अटक केली असून त्यांना 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तुमसर बाजारपेठेत असलेल्या व्यायामशाळेतून हेमंत उके दुचाकीने घरी परत निघाले होते. त्यावेळी मागून आलेल्या एका आरोपीने त्यांच्या डोक्यावर देशी कट्ट्याने दोन गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या वर्षी प्रशांत उके यांच्यावर देखील तुमसरमधील एका आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर उपचारादरम्यान प्रशांत उके यांचा नागपुरात मृत्यू झाला होता.
संतोष डाहट, अमन मेश्राम, कैलाश साठवणे, निशिकांत राऊत, प्रशांत गभणे या पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हत्येत वापरण्यात आलेला देशी कट्टाही ताब्यात घेण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement