एक्स्प्लोर

गडचिरोलीच्या जंगलात ‘टिंग टिंग गोटा’, दगडातून घंटानाद

गडचिरोली जिल्हा सौंदर्याने नटलेला आहे. या जिल्ह्यात नैसर्गिक वनसंपत्ती भरपूर आहे. त्यामुळे अनेक आश्चर्यकारक बाबी येथील जंगलात आढळतात. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील घोटसुर येथील जंगलात असाच एक प्रकार आढळला आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एक अनोख्या प्रकारचा दगड आढळला आहे. या दगडावर कोणत्याही दगडाने किंवा लोखंडी वस्तूने मारा केल्यास मंदिरातील घंटीचा नाद होतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या दगडाला ‘टिंग टिंग गोटा’ असे नाव दिले आहे. गडचिरोली जिल्हा सौंदर्याने नटलेला आहे. या जिल्ह्यात नैसर्गिक वनसंपत्ती भरपूर आहे. त्यामुळे अनेक आश्चर्यकारक बाबी येथील जंगलात आढळतात. राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील घोटसुर येथील जंगलात असाच एक प्रकार आढळला आहे. एटापल्लीच्या जंगलात एका दगडावरवर दगड आपटले, तर घंटा वाजल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाज येतो. एटापल्ली तालुक्यातील घोटसुर गावातील जंगलात ‘टिंग टिंग गोटा’ नावाने ओळखला जाणारा हा दगड आहे. या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर दगडाने मारा केल्यानंतर एखाद्या मंदिरातील घंटीचा नाद, लोखंडाचा आवाज जसा येतो तसा आवाज येतो. त्यामुळे हा दगड जिल्ह्यात कुतुहलाचा विषय बनला आहे. एटापल्ली तालुका मुख्यालयापासून 45 किमीवर घनदाट जंगलात असलेला घोटसूर आदिवासी गाव आहे. 1500 लोकसंख्या असलेला हा गाव नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील मानल्या जातो. या गावात जाण्यासाठी धड रस्तेही नाहीत. मुलभूत सुविधेपासून दूर असलेल्या या गावाला निसर्गाने मात्र भरभरून दिले आहे. या गावापासून दोन किमीवर जंगलात एका ठिकाणी काळ्या रंगाचे अनेक दगड आहेत याच दगडांमध्ये अनेक वर्षापासून एक आश्चर्यकारक दगड आहे. या गावातील अनेक पिढ्यांपासून हा दगड असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. या परिसरातील लोकांना ‘टिंग टिंग गोटा’ दगडाची माहिती होती. मात्र हा परिसर नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असल्याने येथे इतर बाहेरील लोक फार कमी येतात. त्यामुळे या दगडाची माहिती फक्त या परिसरातील नागरिकांपुरतीच मर्यादित होती. पाहा व्हिडीओ :

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Maharashtra Live blog updates: रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
Embed widget