एक्स्प्लोर

महिला दिन विशेष : 'बीजमाता' राहीबाई पोपरेंना नारीशक्ती पुरस्कार, उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

राहीबाई विमानाने दिल्लीला गेल्या असून पहिल्यांदाच राहीबाईंनी विमानवारी अनुभवली. कठीण परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांनी 'माझा कट्टा'वर व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले होते.

अहमदनगर : महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपरे यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत त्यांचा सन्मान होणार आहे. यासाठी राहीबाई विमानाने दिल्लीला गेल्या असून पहिल्यांदाच राहीबाईंनी विमानवारी अनुभवली.  कठीण परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांनी 'माझा कट्टा'वर व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले होते. VIDEO | 'बीजमाता' राहीबाई पोपरे 'माझा कट्टा'वर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 महिलांना नारी शक्ती पुरस्कार जाहिर झाला आहे. यात आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या  राहीबाई पोपरे यांचाही समावेश आहे. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या माहिलांना ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी देशभरातील एकूण 44 महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील सहा महिलांचा समावेश आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा राष्ट्रपती भवन येथे होणार आहे. महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्ययाच्या राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांचा सन्मान होणार आहे. महाराष्ट्रातील सहा दिग्गज महिलांचा सन्मान मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत 15000 पेक्षा अधिक सैनिक प्रशिक्षित केले.  शिवाय त्यांनी  स्वत: ची शुटींगचे तंत्र विकसित केले आहे. त्यांचे  हे तंत्र भारतीय सेनेनही स्वीकारले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईच्या  सुप्रसिद्ध कथक नृत्यागंना सीमा मेहता  यांना कथक नृत्य क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार प्राप्त उद्योजिका कल्पना सरोज यांनी   उद्योग क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने जो ठसा उमटविला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात येणार आहे. मुंबईच्या स्मृती मोरारका यांनी ‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून  पारंपरिक हातमाग क्षेत्रातील कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातमाग समुह  सुरू केला त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना `नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना, त्यांच्या कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सातारा जिल्यातील माण देशी महिला सहकारी  बँकेच्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा  यांना ग्रामीण क्षेत्रातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योगदानाबद्दल `नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग, धाराशिवच्या वृद्ध महिलेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
ABP माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला आली जाग, धाराशिवच्या वृद्ध महिलेला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा
Cabinet Decision : मोठी बातमी! राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
राज्यातील 33 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत धान्य, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप, शासनाचा मोठा निर्णय
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
दुपारी पुण्यात, संध्याकाळी मुंबईत, गोळीबाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला, माहीम परिसरात सोन्याच्या दुकानावर गोळीबार झाल्यानं खळबळ
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 
मोठी बातमी! SIT चं पथक मनोज जरांगे पाटलांच्या घरी दाखल, चौकशी केली जाणार, नेमकं प्रकरण काय? 

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget