भाजपा आणि सेनेला बहुमत दिल्यानंतरही ही भाजपा आणि शिवसेनेमध्ये चालू असलेली तूतू-मैंमैं थांबायचे नाव घेत नाही म्हणूनच भाजप आणि शिवसेनेचे मधला मुख्यमंत्रिपदाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा पदभार माझ्याकडे द्यावा, अशी मागणी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील तरुण श्रीकांत विष्णू गदळे यांनी राज्यपालांकडे केली आहे.
राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी शेतकरी पुत्र असून सध्या परतीच्या पावसाने शेतकरी संकटात आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मला मुख्यमंत्री पदाचा पदभार द्यावा, अशी मागणीही त्याने केली आहे. बीड जिल्हाधिकार्यांमार्फत हे पत्र त्यानं पाठविले आहे.
काय म्हटले आहे पत्रात
मी गेल्या 10ते 15 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात अग्रेसर आहे. शेतकरी, गोरगरिबांच्या प्रश्नावर सातत्याने काम करत आहे. सध्या महाराष्ट्रात प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी, सामान्य वर्ग असताना स्थापनेचा तिढा सुटत नसल्याने शेतकरी वर्ग सापडला आहे. राज्यातील जनतेसाठी हा तिढा सुटणे महत्वाचे आहे. यामुळे जोपर्यंत हा तिढा सुटत नाही तोवर माझ्याकडे मुख्यमंत्री पदाचा पदभार देण्यात यावा अशी मागणी, श्रीकांत गदळे यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांच्या मार्फत राज्यपालांना पत्र लिहिले आहे. या निवेदनाची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने लक्षवेधी आंदोलन करण्याचा इशारा देखील गदळे यांनी दिला आहे.
भाजपा आणि शिवसेनेला जनतेनी स्पष्ट बहुमत दिल्यानंतरही मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षात एकमत होत नसल्यामुळेच राज्यातील जनता नव्या सरकारची वाट पाहत असतानाच या तरुणाने केलेल्या अजब मागणीमुळे सरकारविषयी लोकांच्या असलेल्या भावना आता समोर येऊ लागल्या आहेत.