एक्स्प्लोर

बीडमध्ये जन्मलेल्या सयामी जुळ्यांचा दुर्दैवी मृत्यू

तज्ञ डॉक्टरांनी या बाळाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र बाळाने उपचाराला प्रतिसाद दिला नाही.

बीड : बीडमध्ये जन्मलेल्या सयामी जुळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री जन्मलेल्या दोन तोंडांच्या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बीडमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्री रोग आणि प्रसुती विभागात रविवारी रात्री 8.30 वाजता या बाळाचा जन्म झाला होता. या बाळाला जन्मतःच दोन तोंडं होती. बाळाची आई मूळ परळी तालुक्यातील आहे. प्रसुती विभागातील सर्जन डॉ. संजय बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघड शस्त्रक्रियेद्वारे महिलेची प्रसुती केली. बाळावर वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म

तज्ञ डॉक्टरांनी या बाळाला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र बाळाने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. सोमवारी संध्याकाळी बाळाने अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळ वैद्यकीय अभ्यासासाठी रुग्णालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागात ठेवण्याची विनंती केली होती. मात्र पालकांची मानसिकता याबाबत अनुकूल नसल्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर राखत मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. महिलेची आधीची कागदपत्रं तपासताना बाळामध्ये दोष असल्याचं लक्षात आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी सिझेरियनद्वारे प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. परंतु बाळाला बाहेर काढल्यानंतर त्याला दोन तोंड असल्याचं दिसलं होतं. जन्मावेळी बाळाचं वजन 3 किलो 700 ग्रॅम होतं. एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या बाळांना सयामी जुळेच म्हणतात. मात्र यात एका बाळाची संपूर्ण वाढ झाली होती, तर दुसऱ्या बाळाचं तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेला होता. या बाळाला दोन डोकं, दोन किडनी आणि दोन फुफ्फुसं होती. मात्र इतर अवयव एकच होते. महिलेचं हे पाचवं अपत्य होतं. याआधी तिला तीन मुली आणि एक मुलगा आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2026 | रविवार
Pune News: पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
पवना नदीत पोहण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
Maharashtra Olympic Association : अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड, नेमकी इनसाईड स्टोरी काय?
अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदावर मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड, नेमकी इनसाईड स्टोरी काय?
Maharashtra Live blog updates: बीड पाठोपाठ धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेल टं मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात

व्हिडीओ

New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, संजय राऊतांचा निशाणा
Pravin Tarde on Nasrapur : एक घाव दोन तुकडे करा ना! नसरापूर घटनेवर प्रविण तरटे संतप्त
Sanjay Raut On Nasrapur Case : नसरापूर घटनेला सरकार जबाबदार, जनतेनं सरकारला ताब्यात घेतलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
Embed widget