एक्स्प्लोर
आजोळी आलेल्या 4 वर्षांच्या चिमुरडीचा बसच्या धडकेत मृत्यू
बीड : आजोळी आलेल्या चिमुरडीचा बसच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीडमध्ये समोर आली आहे. अंबाजोगाई-परळी मार्गावर वरवटी पाटीजवळ झालेल्या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
चार वर्षांची वैष्णवी विठोबा जानकर बीडमधील अंबाजोगाई-परळी रोडवरील वरवटी पाटीजवळ रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या लातूर-परभणी बसने तिला जोरदार धडक दिली. या धडकेत ती गंभीर जखमी झाली होती.
दिंडीच्या बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी तिला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. वैष्णवी तिच्या आईसोबत वरवटी येथील आजोळी विठ्ठल सुखदेव उघडे यांच्याकडे आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement