(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वत मार्गावर दरड कोसळली, बीड जिल्ह्यातील यात्रेकरूचा मृत्यू
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरून दर्शन घेऊन खाली उतरत असताना हा अपघात घडला आहे.
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) शहराला अभेद्य असा आधार लाभलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरून (Bramhgiri) दरड कोसळल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अशातच काल दुपारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर दरड कोसळून (Land Collasped) एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ब्रह्मगिरी पर्वतावरून दर्शन घेऊन खाली उतरत असताना हा अपघात घडला आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या सुट्ट्यांचे दिवस (Nashik) असल्याने त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jyotirlinga) आणि ब्रम्हगीरी, गंगाद्वार दर्शनासाठी भाविकांची रोजच गर्दी आहे. त्यामुळे अनेक भाविक जोतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन गंगा गोदावरीचे दर्शन घेत असतात. मात्र गेल्या काही वर्षात ब्रम्हगीरी पर्वतावरून दरड कोसळल्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच काल बीड जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी ब्रम्हगिरी पर्वतावर जाऊन दर्शन घेत खाली उतरत होते. याच वेळी पर्वतावरून दरड कोसळली. यात भाविकांच्या अंगावर दरड कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
याबाबत पोलिसांकडून (Trimbakeshwer Police) मिळालेल्या माहितीनुसार, भानुदास अश्रू आरडे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे सांगण्यात आले. ते बीड जिल्ह्यातील (Beed District) माजलगाव तालुक्यातील हरळी लिमगाव येथील रहिवासी आहे. आरडे हे कुटुंबियांसह त्र्यंबकेश्वर देवदर्शनासाठी आले होते. त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास दर्शनासाठी ब्रह्मगिरीवर गेले होते. ब्रह्मगिरीहुन खाली उतरत असताना ब्रह्मा गुफेजवळ ही घटना घडली. आरडे यांच्या अंगावर तीन ते चार दगड पडल्याने हातपाय आणि डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती तत्काळ त्र्यंबक पोलिसांना कळविली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत ब्रह्मगिरीवरुन डोलीवाल्यांच्या सहकार्याने मयत व्यक्तीस गंगाद्वार येथे आणले. त्यानंतर गंगाद्वारवरून त्र्यंबकराजा मित्र मंडळाच्या रुग्णवाहिकेतून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात (Trimbakeshwer Civil Hospital) दाखल करण्यात आले. त्यावेळी रुग्णालयातील डॉ. प्रशांत पाटील यांनी जखमी रुग्णास तपासून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. त्र्यंबक पोलिस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गंगावणे हे करत आहेत.