एक्स्प्लोर
धनंजय मुंडे, रजनी पाटील लवकरच फरार घोषित

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह, बीड जिल्हा बँकेतील अनेक आजी-माजी संचालकांना, लवकरच फरार घोषीत करण्यात येणार आहे. बीड जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात तब्बल 93 जणांची नावं आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी केली. मात्र एकही आरोपी न सापडल्याने, सर्व आरोपींना कोर्टातून फरार घोषीत करण्यात येणार आहे.
यामध्ये धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह 93 जणांचा समावेश आहे. अवैध कर्जवाटप आणि घोळ बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचं विना तारण कर्ज मंजूर करणं, तसंच कागदपत्राची खातरजमा न करता कर्ज वाटप करणं, या गुन्ह्यात मातब्बर नेत्यांवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित बातम्या
यामध्ये धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे गेवराईचे आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह 93 जणांचा समावेश आहे. अवैध कर्जवाटप आणि घोळ बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचं विना तारण कर्ज मंजूर करणं, तसंच कागदपत्राची खातरजमा न करता कर्ज वाटप करणं, या गुन्ह्यात मातब्बर नेत्यांवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित बातम्या बीड जिल्हा बँकेला आग लागली की लावली?
बँक घोटाळाप्रकरणी धनंजय मुडेंची मध्यरात्री एसआयटीकडून चौकशी
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















