एक्स्प्लोर

रोषणाई, सजावटीला फाटा; गणपती वर्गणीतून शौचालयांची उभारणी

दरवर्षी जमा झालेल्या वर्गणीतून सामाजिक उपक्रम राबवायची परंपरा आहे. त्याच धर्तीवर यंदा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी टोकवाडी गावात चार सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत.

बीड : सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की वर्गणी आलीच. गणेशमंडळानी जमा केलेल्या याच वर्गणीतून रोषणाई, सजावट आणि मिरवणुकीवर लाखोंचा खर्च केला जातो. पण या वर्गणीतून बीड जिल्ह्यातल्या टोकवाडी गावच्या गणेश मंडळाने खास उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम म्हणजे गावात सार्वजनिक शौचालयं उभारुन गाव हागणदारीमुक्त करायचा. बीड जिल्ह्यातील टोकवाडी गावात 16 वर्षांपासून एक गाव, एक गणपती हा उपक्रम राबवला जातो. तेव्हापासून गावात दरवर्षी जमा झालेल्या वर्गणीतून सामाजिक उपक्रम राबवायची परंपरा आहे. त्याच धर्तीवर यंदा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी टोकवाडी गावात चार सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत. डॉ. राजाराम मुंडे यांनी 16 वर्षापूर्वी गावातील लोकांना एकत्र करुन वरद गणेश मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून या गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जातो. प्रत्यक वर्षी वर्गणीतून जमा होणार्या पैशांमधून गणेश मंडळाचे सदस्य आणि गावकरी मिळून विविध उपक्रम राबवतात. यावर्षी गणेश मंडळाने गावात तब्बल दीड लाख रुपय खर्च करुन चार सार्वजनिक शौचालयं बांधली आहेत. या मंडळात शंभरहून अधिक सदस्य आहेत. प्रत्यक महिन्याला या सदस्यांची बैठक होते आणि यात गावाच्या मुलभूत सुविधावर चर्चा केली जाते. यातच गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून एक लाख 75 हजार रुपयांची वर्गणी जमा केली. त्यातून दीड लाख रुपये खर्च करुन शौचालयं उभारली. या गणेश मंडळाच्या वतीने दर वर्षी टोकवाडी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येत. यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. महिन्यातून एकदा स्वच्छता दिंडी काढली जाते. गावात प्रत्यक गल्लीमध्य दुतर्फा झाडं लावण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या काळात बाहेरुन येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी भक्त निवासही बांधण्यात आलं आहे. गावात आता शौचालयं उपलब्ध झाल्याने महिलांना मोठा फायदा होत आहे. गाव रोगराईमुक्त होण्यास मदत होत आहे. या उपक्रमानंतर गावाकऱ्यांमध्ये जनजागृती झाल्याने लोक या शौचालायांचा वापर करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget