एक्स्प्लोर
सोलापुरात गटविकास अधिकाऱ्याला अज्ञातांची बेदम मारहाण
सोलापूर जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. जी नलावडे यांना बार्शीमध्ये मारहाण करण्यात आली आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. जी नलावडे यांना बार्शीमध्ये मारहाण करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मारहाणीत नलावडे जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गटविकास अधिकारी नलावडे हे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी बार्शीला आले होते. यावेळी तिथे असणाऱ्या तीन ते चारजणांनी नलावडे यांना घेरलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. जेव्हा भाऊसाहेब दगडे हे शेतकरी आपलं काम घेऊन आले, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यावर भेटायला आला आहात, असा जाब विचारत ही मारहाण झाल्याची माहिती मिळते आहे. नलावडे यांना सध्या बार्शीतील जगदाळे मामा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















