(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शिखर बँक घोटाळा | बारामती बंदची हाक, पवार साहेबांवर सूडबुद्धीने कारवाई केल्याचा बारामतीकरांचा आरोप
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा कर्ज वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. या निर्देशांनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बारामती : महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांसह एकूण 70 नेत्यांवर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. ईडीने केलेल्या कारवाईविरोधात बारामतीकरांनी बारामती बंदची हाक दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा कोणत्याही संघटनेने बारामती बंदची हाक दिलेली नसून सामन्य नागरिकांनी हा बंद पुकारला आहे, अशी प्रतिक्रिया बारामतीकरांना दिली आहे. बारामती बंदला उत्स्फुर्त मिळत आहे. बारामतीतील बाजारपेठा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून शाळेत आलेले विद्यार्थीही शाळा बंद असल्याने परत घरी निघाले आहेत.
पवार साहेबांवर सूडबुद्धीने कारवाई होत आहे. पवार साहेबांवर अन्यात होत असून खोटे आरोप करून पवार साहेबांना बदनाम केलं जात आहे, अशी प्रतिक्रिया बारामतीकरांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील हजारो कोटी रुपयांचा कर्ज वितरणात घोटाळा झाल्याचा आरोप आहे. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. या निर्देशांनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्वपक्षीय बड्या नेत्यांवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल 25 हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह 76 मोठ्या नेत्यांवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता आरोपींचा आकडा 300च्या घरात जाण्याची शक्यता देखील तक्रारदारांच्या वकिलांनी वर्तवलीय.
EXPLAINER VIDEO | शिखर बॅंक घोटाळा आणि महाराष्ट्राचं राजकारण | बातमीच्या पलीकडे | ABP Majhaमहाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला तब्बल 1 हजार 500 कोटींचा फटका
- संचालक मंडळाकडून नाबार्डच्या सूचनांचं उल्लघंन केल्याचा आरोप
- 9 साखर कारखान्यांना 331 कोटींना कर्जपुरवठा
- गिरणा, सिंदखेडा करखाना, सूतगिरण्यांना 60 कोटींचं कर्ज
- केन अग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं 119 कोटींचा तोटा
- 24 साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, 225 कोटींची थकबाकी
- 22 कारखान्यांकडील 1995 कोटींचं कर्ज असुरक्षित
- लघुउद्योगाला दिलेल्या सव्वा तीन कोटींचं नुकसान
- कर्जवसुलासाठी मालमत्ता विक्रि करुनही 478 कोटींची थकबाकी
- खासगी पद्धतीने मालमत्ता विक्रि, 37 कोटींचं नुकसान
- 8 थकवाकीदारांच्या मालमत्ता विक्रित 6 कोटी 12 लाखांता तोटा
कोणावर कितीची जबाबदारी
- शिवाजीराव नलावडे 34 कोटी
- राजवर्धन कदमबांडे 25
- बाळासाहेब सरनाईक 24 कोटी
- अजित पवार 24 कोटी
- दिलीपराव देशमुख 23 कोटी
- जयंत पाटील 22 कोटी
- तुकाराम दिघोळे 22 कोटी
- मधुकरराव चव्हाण 21 कोटी
- आनंदराव आडसूळ 21 कोटी
- प्रसाद तनपूरे 20 कोटी
- जगन्नाथ पाटील 20 कोटी
- गंगाधर कुटुंरकर 20 कोटी
- मदन पाटील 18 कोटी
- जयवंतराव आवळे 17 कोटी
- राजेंद्र शिंगणे 17 कोटी
- मिनाक्षी पाटील 12 कोटी
- राहुल मोटे 4 कोटी
- रजनीताई पाटील 4 कोटी