एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये फुकटची बँक स्लिप 20 रुपयांना, तर भरण्यासाठी 10 रुपये
नाशिक : बँकेतून पैसे काढण्यासाठी आदिवासींची कशी पिळवणूक केली जात आहे, त्याचं उदाहरण नाशिकमधील थानपाडा या गावात समोर आलं आहे. इथे बँकेतून पैसे काढण्याची स्लिप 20 रुपयांना विकली जात आहे, तर ती भरण्याचे 10 रुपये घेतले जात आहेत, असं वृत्त 'नवभारत टाईम्स'ने दिलं आहे.
थानपाडा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेबाहेर हा स्लिप विकण्याचा काळा बाजार सुरु आहे. गावकरी तासनतास बँकेच्या खिडकीसमोर उभे राहतात. बँक कर्मचारी वाटेल तेव्हा नाव घेऊन गावकऱ्यांना बोलावतात, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
मात्र खिडकीकडून परतताना निराशाच येते, कारण ती स्लिप भरण्यात चूक झाली आहे, असं सांगत पुन्हा दुसरी स्लिप खरेदी करायला लावली जाते. पैसे घेऊन ती भरुन देण्यासाठीही गावकऱ्यांभोवती एजंटचा गराडा तयारच असतो.
20 रुपये ही आदिवासांसाठी मोठी रक्कम आहे. एवढ्या पैशात त्यांचा महिन्याचा खर्च निघू शकतो. त्यात हक्काचे पैसे काढण्यासाठी खिशातले पैसे खर्च करावे लागत आहेत. बँकेच्या या कारभाराबाबत अनेकदा तक्रार करुनही काही कारवाई होत नसल्याचं 'नवभारत टाईम्स'च्या वृत्तात म्हटलं आहे.
बँक व्यवस्थापक आलोक सिंह यांनीही स्लिप विकल्या जात असल्याचं कबूल केलं आहे. बँकेतीलच एखादा कर्मचारी यामध्ये सहभागी असून स्लिपची फोटोकॉपी विकली जात असल्याचं आलोक सिंह म्हणाले.
बँकेकडून ग्राहकांना पैसे काढण्यासाठी किंवा पैसे जमा करण्यासाठी स्लिप मोफत दिली जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement