एक्स्प्लोर

Champa singh Thapa : 'मातोश्रीचा सेवक' शिंदे गटात; बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापांची शिंदेना साथ

Champa singh Thapa : बाळासाहेबांचे  सहाय्यक चंपासिंह थापा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे.

मुंबई :   शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना (Shivsena)  पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर आता बाळासाहेबांचे  सहाय्यक चंपासिंह थापा (Champasingh Thapa)  यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा अशी  ओळख आहे.

ठाकरे कुटुंबासाठी हा सर्वात मोठा धक्का

चंपासिह थापा यांचे शिंदे गटात जाणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. चंपासिंह थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला एक भावनिक किनार आहे कारण थापाला बाळासाहेबांची सावली म्हटले जात होते. गेली अनेक वर्षे बाळासाहेबांचा विश्वासू सेवक म्हणून चंपासिंह थापाकडे पाहिले जात होते. चंपासिंह थापा हे नेपाळचे असून 30 वर्षापूर्वी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करत होता. मुंबईच्या कबड्डीत के. टी. थापा हे नाव खूप मोठे होते. त्यानंतर के. टी. थापा भांडुपचे नगरसेवक झाले. त्यानंतर के. टी. थापांच्या सोबतीने चंपासिंह थापा मातोश्रीवर आले आणि बाळासाहेबांचा सेवेकरी बनले. 

बाळासाहेबांच्या जवळील अतिशय विश्वासू व्यक्ती

चंपासिंह थापा हा बाळासाहेबांच्या जवळील अतिशय विश्वासू व्यक्ती मानली जात होती. बाळासाहेबांच्या जेवणाच्या, औषधाच्या वेळा त्याना सांभाळल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मीनाताईंचे निधन झाल्यानंतर बाळासाहेबांसाठी भावनिक आधार होते. चंपासिंह थापा घरात,  समारंभात, दौऱ्यावेळी बाळासाहेबांसोबत कायम दिसले.  चंपासिंह थापा यांनी जानेवारी महिन्यात मी बाळासाहेबांनंतर देखील मातोश्रीचा सेवक आहे, असे ठामपणे सांगितले. पण  आता आठ महिन्यानंतर अचानक चंपासिंह थापा हे शिंदे गटात सामिल होणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी धक्कादायक आहे. 

नेपाळमध्ये शिवसेना स्थापन करण्यात चंपासिंह थापा यांची महत्त्वाची भूमिका

बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेणारा थापा हा ठाकरे कुटुंबाचा सदस्य बनला. थापाचे कुटुंब हे नेपाळला आहे. वर्षातून थापा कुटुंबियांना भेटण्यासाठी जातो. नेपाळमध्ये शिवसेना स्थापन करण्यात चंपासिंह थापा यांची महत्त्वाची भूमिका होती. 

संबंधित बातम्या :

Maharashtra Politics: 'वर्षा' सोडताना नवरीसारखं सोंग केलं; संदिपान भुमरेंची उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

Sandipan Bhumre: 'फक्त मैदानात या दाखवतो', पालकमंत्री होताच भुमरेंचा खैरे-दानवेंवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget