Bala Nandgaonkar:आजच्या तारखेला अख्ख्या भारतात आशिष शेलार साहेब एक नंबरचे वक्ते; बाळा नांदगावकरांचा शेलारांना शालजोडा
मेळाव्यावर बोलताना बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की कालचा दिवस शब्दांमध्ये मांडता येणार नाही. ठाकरे कुटुंबांनं महाराष्ट्राला, आम्हाला बाळासाहेबांना आणि भाजपला खूप काही दिलं आहे.

Bala Nandgaonkar: हिंदी सक्तीचा वरवंटा दूर केल्यानंतर मराठीच्या विजयी मेळाव्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्रित येण्यासाठी साद घातल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या आहेत. भाजपकडून खोचक टिपणी होत असतानाच मुंबई भाजप अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा ठाकरे बंधूंच्या भाषणावर टीका केली आहे. अपूर्ण भाषण असल्याचा टोला सुद्धा शेलार यांनी लगावला. यांच्या टीकेला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावताना शालजोडा लगावला आहे. आजच्या तारखेला अख्ख्या भारतात आशिष शेलार साहेब एक नंबरचे प्रवक्ते असल्याचा शालजोडा बाळा नांदगावकर यांनी लगावला. शेलार यांचं कौतुक असल्याचेही ते म्हणाले. तुमचा पक्ष काय सामाजिक संस्था आहे का? अशी विचारणा सुद्धा बाळा नंदगावकर यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले टीकेला सुद्धा बाळा नांदगावकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की त्यांना सगळेच माहीत आहे.
Raj Thackeray Speech Video: लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? ठाकरेंची शाळा काढताच राज ठाकरेंनी फडणवीसांची घेतली 'शाळा' #MaharashtraPolitics #RajThackeray https://t.co/63QZp6NwAb
— ABP माझा (@abpmajhatv) July 6, 2025
काल झालेल्या मेळाव्यावर बोलताना बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की कालचा दिवस शब्दांमध्ये मांडता येणार नाही. ठाकरे कुटुंबांनं महाराष्ट्राला, आम्हाला बाळासाहेबांना आणि भाजपला खूप काही दिलं आहे. संपूर्ण परिवार एकत्र आल्याचा आनंद असल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले.
काय म्हणाले आशिष शेलार?
भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना म्हटले आहे की, दोघांच्याही भाषणात अप्रामाणिकपणा होता. उद्धव यांच्या भाषणात तडफड दिसत होती. दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजे होते. मेळाव्यातील 'म' हा महानरपालिकेचा असल्याची टीका देखील शेलार यांनी यावेळी बोलताना केली". उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्ता गेली याचं भावना होत्या. त्यांचा हेतू अप्रामाणिक आणि राजकीय आहे, असे शेलार म्हणाले. रस्तावर गोट्या खेळा, असं म्हणत शेलार यांनी राज ठाकरेंच्या रस्तावर सत्ता आमची आहे, या वक्तव्याची खिल्ली उडवली.
Nitin Gadkari: देशात गरिबांची संख्या वाढत आहे, काही श्रीमंत लोकांच्या हातामध्येच संपत्ती एकवटली; रोखठोक नितीन गडकरींनी पुन्हा दाखवला वास्तवाचा आरसा #nitingadkari https://t.co/5TxU6cjGti
— ABP माझा (@abpmajhatv) July 6, 2025
इतर महत्वाच्या बातम्या
























