Bachchu Kadu On Navneet Rana : अमरावतीच्या (अमरावती) विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा अमरावती लोकसभा मतदारसंघातून (Amravati Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून (BJP) त्यांना महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलत नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे. यावरच प्रतिक्रिया देतांना नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे पाहायला मिळाले. यावरून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी खोचक शब्दात नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. 'किती वेळा रडणार, लोकांची सहानुभूती आता संपलीय' असे बच्चू कडू म्हणाले आहेत. 


नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, “जनतेचं उत्तर काही वेगळं असून, त्या जनतेच्या न्यायालयात हरणार आहेत. रडणे म्हणजेच सहानभूती मिळवणे. पण आता ती सहानभूती संपली असून, तुम्ही किती वेळा रडणार आहेत. निवडणुकीत रडणं चांगले नसते. तुम्ही सामन्य लोकांसाठी रडल्या असतात तर आम्हाला त्याची कीव वाटली असती. तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत असाल तर हेच दुर्देवी आहे, असं ब्छ्चू कडू म्हणाले. 


सर्वसामान्य माणसाचा न्यायालयावर असलेला विश्वास पायदळी तुडवला जातोय...


उच्च न्यायालयाचा तब्बल 108 पानांचा निकाल होता, मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते सर्व काही बाजूला ठेवून निकाल दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे निकाल लागण्याच्या आधीच निकाल लागला असे म्हणाले होते. आता अतिरिक्तची हद्द संपली आहे. एवढा अतिरिक्त नको. निकाल लागण्याच्या आधीच बावनकुळे म्हणतात निकाल आमच्या हाती आहे, एवढी जर तानाशाही सुरू असेल, आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा न्यायालयावर विश्वास आहे, तो विश्वास असा पायदळी तुडवला जात असेल, तर सर्व काही संपल्यात जमा आहे. 


लोकांचा यंत्रणेवरील विश्वास संपत चालला आहे...


काल चालता चालता मला एकाने धमकीची चिठ्ठी दिली. त्यामुळे विरोध करणारे आता थोडके लोक राहणार आहेत. अत्यंत वाईट अवस्था असून, विरोध करणारे लोकच देशात ठेवले जाणार नाही. धर्म जातीचे नाव समोर करून पिळवणूक करणे सुरू असेल. बरं टायमिंग किती व्यवस्थित आहे. अर्ज भरण्याच्या वेळेस निकाल येतो, एवढ्या टाइमिंगवर न्यायालय कसे चालते. त्यामुळे देशातील लोकशाही टिकावी असं ज्यांना वाटतं त्यांनी याचा विरोध केला पाहिजे. मी सैनिक म्हणून समोर आहोत, पण या सैनिकांना मदत करण्याचं आणि जोश देण्याचं काम देखील मतदारांनी केले पाहिजे. एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचा आपण पुतळा लावतो, पूजा करतो आणि दुसरीकडे त्यांच्या संविधानाची चिरफाड करतोय. हा बाबासाहेबांचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे. लोकांचा यंत्रणेवरील विश्वास संपत चालला आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Navneet Rana on SC Verdict : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नवनीत राणा भावूक; हमसून हमसून रडल्या